Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड रेमडेसिविरच्या ऐवजी एका व्यक्तीने घेतले रेमो डिसूझाचे नाव, त्यानेही शेअर केला मजेशीर व्हिडिओ; पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

रेमडेसिविरच्या ऐवजी एका व्यक्तीने घेतले रेमो डिसूझाचे नाव, त्यानेही शेअर केला मजेशीर व्हिडिओ; पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

भारतात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे अनेक सोयी- सुविधांची कमतरता भासत आहे. अशातच रेमेडेसिविर इंजेक्शनचा तर खूपच तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनच्या नावावरून एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने रेमेडेसीवीर ऐवजी रेमो डिसूझा असे नाव घेतले आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझाने शेअर केला आहे.

रेमो डिसूझाने एका चॅनेलला मुलाखत देणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो इंजेक्शनच्या ऐवजी चुकून त्याचं नाव घेतो. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “तो केवळ हसण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे. त्याला असे नाही वाटत की, त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओचा शेवट चुकवला पाहिजे.”

रेमो डिसूझा याने शेअर केलेला हा व्हिडिओ एक मुलाखत आहे. ज्यामध्ये तो भारतातील वर्तमान स्थिती सांगत आहे. त्यांनतर तो रेमेडेसिविर इंजेक्शन बद्दल सांगतो. परंतु या इंजेक्शनच्या नावाचा त्याने योग्य उच्चार करण्याऐवजी शिपला कंपनीचे रेमो डिसूझा असा उच्चार केला.

एका न्यूज चॅनलने काही स्थानिक लोकांना कोरोनाच्या वाढत्या प्रभावाबद्दल विचारले, तेव्हा त्यातील एका व्यक्तीने सांगितले की, “या देशातील अधिकारी 500 रुपये लाच घेतात. 500 रुपयाचे इंजेक्शन रेमो डिसूझा येत आहे. त्याची किंमत 5000 रुपये आहे. त्या व्यक्तीला रेमेडेसिविर असे म्हणायचे होते. परंतु चुकून त्याच्या तोंडून रेमो डिसूझा असे आले. पण त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. सगळेजण या व्हिडिओवर कमेंट करून हसत आहेत.तसेच स्वतः रेमो डिसूझा यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांनी देखील सगळे हसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुलगा ऋतिक रोशनप्रमाणेच राकेश रोशनही आहेत बेस्ट डान्सर? सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

-‘सीटी मार’ गाण्यावर थिरकली ‘बजरंगी भाईजान’ फेम मुन्नी, चाहत्यांनी दर्शवली पसंती; पाहा व्हिडिओ

-जमलंय म्हणायचं! सुगंधा मिश्राने केला लता दीदींची मिमिक्री करतानाचा व्हिडिओ शेअर, सांगितला भोसले होण्यापर्यंतचा प्रवास

हे देखील वाचा