Tuesday, July 9, 2024

‘अप्सरा अवतरली जमिनीवर…’, वाळवंटात चालताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; पाहून उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉट आणि गॉर्जियस लूकसाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. उर्वशीने तिच्या स्टाईल आणि बोल्ड लूकने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. उर्वशी सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर उर्वशीचा सोशल मीडियावर चाहतावर्गही खूप मोठा आहे. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या उर्वशीने तिचा एक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला वाळवंटात सुंदर अंदाजात चालताना दिसत आहे.

वाळवंटात चालताना दिसली अभिनेत्री
उर्वशी रौतेलाने तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी स्टायलिश लुकमध्ये वाळवंटात फिरत आहे. या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा सुंदर गाऊन घातला आहे. तसेच यात ती खूप बोल्ड आणि गॉर्जियस दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन लिहिले की, “दोन्ही बाजूने वाट पाहिली तर चांगले वाटते.” चाहत्यांना उर्वशी रौतेलाचा हा जबरदस्त व्हिडिओ खूप आवडला आहे. एका युजरने कमेंट केली की, “अप्सरा आली.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “तुझी अदा जबरदस्त आहे.” यासह तिच्या या व्हिडिओला १ मिलियन पेक्षाही अधिक व्ह्यूज आणि १२२ हजार पेक्षाही अधिक लाइक्स मिळाले आहेत. ( The nymph landed on the ground, the reaction of the fans on seeing this actress)

उर्वशी रौतेलाचे आगामी चित्रपट
अभिनेत्री उर्वशी रौतेला लवकरच तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर ती द्विभाषिक थ्रिलरमध्ये दिसणार आहे. अभिनेत्री अलीकडेच गुरु रंधावासोबत ‘डूब गये’ आणि मोहम्मद रमजानसह ‘वर्साचे बेबी’ या गाण्यांमध्ये दिसली, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. उर्वशी जिओ स्टुडिओच्या वेबसीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये ती रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या सत्य कथेवर आधारित बायोपिक आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा