Monday, July 1, 2024

उर्फी जावेदच्या फॅनने सेल्फी घेण्याच्या नादात तिच्यासमोर आणि मीडियावाल्यांसमोरच थुंकला तोंडातला गुटखा, व्हिडिओ झाला व्हायरल

आली आली पुन्हा एकदा उर्फी जावेद मीडियासमोर आली. अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर गाजताना दिसते. एक अभिनेत्री असलेल्या उर्फीला तिच्या अभिनयापेक्षा प्रसिद्धी तिच्या या विचित्र फॅशनने मिळवून दिली. ती नेहमीच अतरंगी कपडे घालून मीडियासमोर येते आणि तुफान लाईमलाइट मिळवते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी उर्फी नेहमीच तिच्या फॅशनचे आणि इतर व्हिडिओ, फोटो शेअर करताना दिसते. दररोजच उर्फी तिच्या नवनव्या लूकने नेटकऱ्यांना वेड लावत असते. नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नक्कीच तिच्या इतर व्हिडिओंपेक्षा निराळा आणि हास्यास्पद आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फी नेहमीसारखी तिच्या वेगळ्या अवतारात दिसत असून, ती बाहेर आल्यानंतर तिला मीडियाने आणि पॅपराजीच्या कॅमेऱ्यांनी घेरले असताना अचानक तिचा एक फॅन तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आला मात्र त्याच्या तोंडात गुटखा होता. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्या व्यक्तीने तिच्यासमोर आणि संपूर्ण मीडियासमोर तोंडातला गुटखा थुंकला. ते पाहून मीडियावाले खूपच चिडले तर उर्फीला तिचे हसूच रोखता येत नव्हते. त्या व्यक्तीला देखील तितेच थुंकला थोडा देखील पश्चताप झालेला दिसला नाही. त्याला थुंकताना पाहून अनेकांनी त्याला ‘गुटखा लव्हर’ देखील म्हटले.

त्यानंतर ती व्यक्ती हसत सॉरी तर म्हणत होती, मात्र सॉरी म्हणताना पुन्हा थुंकली देखील. तो व्यक्ती सेल्फी घेऊन गेल्यानंतर मीडियावाले उर्फीला पुढे येऊन पोज देण्यासाठी सांगतात मात्र उर्फी थुंकलेले दाखवत पुढे न येता त्यांना फोटो काढण्याची विनंती करते. यावेळी देखील उर्फीचा लूक खूपच वेगळे मात्र आकर्षक होता. पिंक आणि पर्पल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये असलेल्या उर्फीने पिंक रंगाचे हाय हिल्स सॅंडल आणि त्यावर कर्ली केसांची पोनी घातली होती.

सध्या उर्फीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्स करताना उर्फीला त्या माणसाला थुंकण्यापासून न रोखता आल्यामुळे आणि थुंकल्यावर त्याला न बोलल्यामुळे खरीखोटी ऐकवत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर असलेल्या विरल भियानी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. उर्फीने ‘बडे भैय्या की दुल्हनिया’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’ आदी मालिकांमध्ये काम केले मात्र तिला खरी लोकप्रियता बिग बॉसच्या ओटीटी मधून मिळाली.

हेही वाचा :

हे देखील वाचा