अभिनेत्री अदा शर्मा चित्रपटांमध्ये खूप कमी वेळा दिसली आहे. परंतु ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या काही विचित्र फॅशन सेन्स आणि पोस्टमुळे ती अनेकदा चर्चेत येते आणि नेहमी प्रकाशझोतात राहते. एकीकडे, हजारो चाहते पोस्टवर कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुक करतात. तर दुसरीकडे अनेक वेळा तिला तिच्या पोस्ट ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो.
पुन्हा एकदा अदा शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये ती कारमध्ये बसून कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. सोबतच ती युजर्सला म्हणत आहे की, “अदा आणि खोटं, कधीही नाही, कधीच नाही.” अदा शर्माचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
त्याचसोबत यावर १ लाख लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. इतकेच नव्हे तर तिने कॅप्शन दिले आहे की, “कमेंट बॉक्समध्ये खोटे बोला आणि सर्वात चांगले खोटे बोलणाऱ्याला बीएमडब्ल्यू आणि आयफोन मिळेल.” तेव्हापासून चाहत्यांनी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अलीकडेच अदा शर्माचे लेटेस्ट फोटोही चर्चेत होते, ज्यात एक वेगळी स्टाईल पाहायला मिळत होती. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या लहानपणापासून आतापर्यंत काही बिकिनी कलेक्शन दाखवले. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले. फोटोंसोबतच कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘एक एक करून पाहा. मी पहिला पिवळा पोल्का डॉट बिकिनी घातली होती तेव्हा हा माझा फोटो आहे.’ अदाने २०१४ साली ‘हार्ट अटॅक’ या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर, ती अल्लू अर्जुनसोबत ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ या चित्रपटातही दिसली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा
-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’