Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड धुरंदर 2च्या ट्रेलरची रिलीज डेट झाली जाहीर, आता धमाक्यासाठी रणवीर सिंग सज्ज

धुरंदर 2च्या ट्रेलरची रिलीज डेट झाली जाहीर, आता धमाक्यासाठी रणवीर सिंग सज्ज

रणवीर सिंग अभिनित धुरंदर हा चित्रपट प्रचंड गाजला. तर याचा सेकंड पार्ट ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मात्र त्याआधी चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहे, आणि हा ट्रेलर उद्या सात मार्च रोजी रीलीज होत आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार धुरंदर तुमच्या प्रदर्शनापूर्वीच ऍडव्हान्स मधून बुकिंग कमाई  झाली आहे. या चित्रपटातील आगामी ट्विस्टची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जिओ स्टुडिओजने एका पोस्टमधुन ही माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की “धुरंधर द रिव्हेंज” चा ट्रेलर उद्या, 7 मार्च रोजी सकाळी 11.01 वाजता प्रदर्शित होईल. पोस्टच्या कॅप्शनमध्ये विविध भाषांमध्ये लिहिले आहे, “धैर्य बदलते, तर हा धुरंधर द रिव्हेंज 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होत आहे.” या अपडेटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका व्यक्तीने लिहिले, “ते लवकर रिलीज करा, मी आता जास्त वाट पाहू शकत नाही.

डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या आदित्य धरच्या “धुरंधर” चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले नाहीत तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक परिदृश्यावर अमिट छाप सोडली. हा चित्रपट स्पाय थ्रिलर, गँगस्टर ड्रामाचे एक अनोखे मिश्रण आहे, जे प्रेक्षकांनी स्वीकारले. आदित्य धरची खरी तज्ज्ञता चित्रपटाच्या सादरीकरणात स्पष्ट होती. त्याने कराचीच्या अशांत लियारी परिसरातील रस्त्यांवर सेट केलेली एक जटिल गुप्तहेर कथा एका उच्च-ऑक्टेन गँगस्टर ड्रामा म्हणून सादर केली.

चित्रपटाच्या यशाचे श्रेय पुर्ण टिमला जाते. अक्षय (Akshay)खन्नाने त्याच्या दमदार अभिनयाने चित्रपटात जीव ओतला, ज्याची सोशल मीडियावर अजूनही चर्चा सुरू आहे. संजय दत्तने एका कठोर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपली उपस्थिती दाखवली, तर राकेश बेदीने एका धूर्त राजकारण्याच्या भूमिकेत कथेत विनोदाचा स्पर्श जोडला. आर. माधवन चित्रपटाचा नैतिक आधारस्तंभ बनले आणि अर्जुन रामपालने एका निर्दयी खलनायकाची भूमिका केली. रणवीर सिंग यांनी उत्कृष्ट अभिने केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

धुरंदर2 आधी वादाला तोंड, कोणावर भडकली यामी गौतम? कृती सॅननशी जोडला आहे विषय

 

हे देखील वाचा