‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिने या मालिकेत अनघाची भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या गुणी आणि संस्कारीक सूनेचे पात्र लोकांना खूप आवडले आहे. अश्विनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांशी संंपर्कात रागण्याचा प्रयत्न करते.
अश्विनीचा (Ashwini Mahangde) सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. अश्विनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. अश्विनीने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे सांगितले आहे.
पोगस्ट करताना अश्विनीने लिहिले की, “मेरे साई या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग परवा प्रदर्शित झाला. या मालिकेने प्रेक्षकांंचा निरोप घेतला आहे. मी साधारण 1 वर्ष या मालिकेचा भाग होते. तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका होती. खरे तर शब्द उच्चाराचे, पाठांतर होत नसायचे, मला जमेल न अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. पण मी प्रयत्न केले.मी सर्वींची आभारी आहे की मला एवढी मोठी संधी दिली. त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन”, असे अश्विनी महांगडेने म्हटले आहे.
View this post on Instagram
अश्विनी महांगडे विषयी बोलायच झाल तर, तिने मराठी मालिकांसह मराठी चित्रपटात देखील दमदार कामगिरी केली आहे. तिने अश्विनीने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणूअक्का ही भूमिका साकारली. त्यानंतर ती आता ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारताना दिसत आहे. लवकरच अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार होत आहे, यात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. (The social media post of ‘Aai Khe Kya Karte’ fame actress Ashwini Mahangde went viral)
अधिक वाचा-
–‘बदन पे सितारे लपेटे हुए…’, उर्फीचा लेटेस्ट लूक पाहिलात का?
–“नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत