Wednesday, April 23, 2025
Home भोजपूरी अक्षरा सिंगच्या ‘या’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! अवघ्या ८ महिन्यात मिळाले २२ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

अक्षरा सिंगच्या ‘या’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! अवघ्या ८ महिन्यात मिळाले २२ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने केवळ चित्रपटात नव्हे, तर संगीत अल्बममध्ये देखील आपला चांगला जम बसवला आहे. जेव्हा जेव्हा ती आपले नवीन गाणे चाहत्यांच्या भेटीला घेऊन येते, तेव्हा तिच्या सर्वच गाण्यांना तुफान पसंती मिळते. अक्षरा आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. टिक टॉकच्या माध्यमातून तिने अनेक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. अक्षराच्या अनेक व्हिडिओंना लाखोंच्या आसपास प्रेक्षक पसंती दर्शवतात. तिची प्रत्येक गाणी आणि चित्रपट प्रेक्षकांना खूप भावतात.

नुकताच अक्षराचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ कोट्यवधी व्ह्यूज क्लबमध्ये सामील झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘ईधर आने का नही’ हे टिक टॉक रॅप असून रिलीझ होताच प्रचंड व्हायरल झाले आहे.

अक्षराने आपले हे गाणे जुलै २०२० मध्ये तिच्या यूट्यूब चॅनलवर रिलीझ केले होते. ज्याला आतापर्यंत २२ कोटींहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहे. यात तिच्या ग्लॅमरस स्टाईलची चर्चा सगळीकडेच होत आहे. यात ती कधी कारमधून रोड ट्रिप करताना दिसतेय, तर कधी रॉयल एनफिल्डमधून अनोख्या अंदाजात दिसतेय. तिच्या प्रत्येक अंदाजाने ती चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे. आपल्या वेगवेगळ्या मोहक अदांच्या तिच्या या व्हिडिओला केवळ आठ महिन्यात २२ कोटींहून अधिक वेळा पाहिले आहे. यातूनच तिच्या प्रसिद्धीचा अंदाज दिसून येतो.

अक्षराचे होळी स्पेशल गाणे देखील तुफान गाजले होते. खास गोष्ट अशी आहे की, या गाण्याला तिने स्वत: गायले आहे. इतकेच नाही तर या गाण्याच्या व्हिडिओमध्ये तिने स्वत: देखील अभिनय केला आहे. या आधी अक्षराने प्रायव्हेट रोमान्स हे गाणे रिलीज केले होते. हे गाणे वेस्टर्न संगीतावर आधारित होते. भोजपुरी प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडले होते.

भोजपुरीमधील टॉप अभिनेत्रींमध्ये अक्षराची गणना होते. २०१३ सालच्या रवी किशन यांच्या ‘सत्यमेव जयते’ या भोजपुरी चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. त्यासोबत तिने ‘काला टीका’ आणि ‘सुर्यपूत्र कर्ण’ यांसारख्या मालिकेतही काम केले होते.

कोरोना काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ती स्वत: रस्त्यावर उतरली होती. तिने नागरिकांना मास्क वाटले होते. सोबतच नागरिकांना तिने ग्लोव्हज आणि सॅनिटायझर देखील उपलब्ध करून दिले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा