Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड टीव्हीपासून केली होती नुसरतने आपल्या कारकिर्दीची सुरुवात; आज आहे कोट्यावधी संपत्तीची मालकीण

टीव्हीपासून केली होती नुसरतने आपल्या कारकिर्दीची सुरुवात; आज आहे कोट्यावधी संपत्तीची मालकीण

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. नुसरतने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर रुपेरी पडद्यावर आपली छाप पाडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त नुसरत तिच्या बोल्ड स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. अशात नुसरत बुधवारी (दि. 17 मे)ला तिचा 38वा वाढदिवस साजरा करणार आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल…

असे म्हणतात ना की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तसेच काहीसे नुसरत सोबतही घडले आहे. परंतु नुसरतने कधीच हार मानली नाही आणि चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले. आज नुसरतने यशाचे शिखर गाठले आहे. हे यश मिळवणे तिच्यासाठी कधीच सोपे नव्हते, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आज या लेखात आपण नुसरतच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. (The sweetie of ‘Sonu Ke Titu Ki Sweety’ is a billionaire, look how much wealth there is)

नुसरतची एकूण संपत्ती
नुसरतने स्वतःहून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, नुसरतची एकूण संपत्ती ५ दशलक्ष आहे. नुसरत दरवर्षी लाखोंची कमाई करते. इतकेच नव्हे, तर नुसरत एका चित्रपटासाठी लाखोच्या घरात मानधन घेते. परंतु प्रत्यक्षात नुसरत एका चित्रपटासाठी किती शुल्क घेते, याबद्दल अजूनही अधिकृत माहिती मिळाली नाही. नुसरत फक्त चित्रपटातूनच कमावते असे नाही, तर तिचे कमावण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, नुसरत अभिनय, जाहिरात आणि मॉडेलिंग करते ज्यामधून ती बक्कळ पैसे कमावते आहे.

नुसरतकडे आहेत ‘या’ कार
अभिनेत्री नुसरत भरुचाकडे अनेक महागड्या कार आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, नुसरतकडे बीएमडब्ल्यू एक्स 3, बीएमडब्ल्यू 6, Series GT सारख्या गाड्या आहेत. त्याचबरोबर नुसरतचे मुंबईत स्वतःचे घर देखील आहे.

अथक प्रयत्नांनी मिळवलंय यश
हॉट अभिनेत्री नुसरत भरूचाने छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली होती. तिने प्रसिद्ध टीव्ही शो ‘किट्टी पार्टी’ पासून सुरुवात केली. नुसरतने आपल्या रुपेरी पडद्यावरील करिअरची सुरुवात ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाने केली, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर ती 2009मध्ये ‘कल किसने देखा है’ या चित्रपटात दिसली. नुसरतला 2011मध्ये ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून चाहत्यांच्या मनात स्थान मिळाले. त्यानंतर 2005मध्ये आलेला ‘प्यार का पंचनामा 2’ हा चित्रपट हिट ठरला. 2018मध्ये नुसरतला खरी ओळख मिळाली ती म्हणजे त्याच वर्षी आलेला ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने. या चित्रपटानंतर नुसरतच्या कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दिल तुम्हारा हो गया” या ‘अनलॉक जिंदगी’मधील गाण्यातून व्यक्त होणार मनातील ‘त्या’ हळुवार भावना
मराठमोळ्या तोऱ्यात रिंकू राजगुरूने चालवली गाडी, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा