मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जेनेट लँडगार्ड यांचे 12 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1947 रोजी पासाडेना, कॅलिफोर्निया येथे झाला होता.
लँडगार्ड (Janet Landgard) यांनी 1963 मध्ये ‘द डोना रीड शो’ मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्यांनी या शोच्या पाचव्या सीझनमधील एका भागामध्ये सबरीना नावाच्या मुलीची भूमिका साकारली. त्या वर्षी एबीसीच्या ‘माय थ्री सन्स’ या शोमध्येही त्यांनी पाहुणी कलाकार म्हणून काम केले.
लँडगार्ड यांना 1968 मध्ये बर्ट लँकेस्टरसोबत ‘द स्विमर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वाधिक ओळखले जाते. या चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर ठरली. लँडगार्ड यांनी ‘द डोना रीड शो’ मध्ये जेफची (पॉल पीटरसन) मैत्रीण कॅरेनची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना 1965 मध्ये ‘द हॉलीवूड डेब स्टार्स ऑफ 1965’ या टीव्ही स्पेशलमध्ये 10 नवोदित अभिनेत्रींपैकी एक म्हणून गौरवण्यात आले होते.
Janet Landgard, ‘The Swimmer’ and ‘The Donna Reed Show’ Actor, Dies at 75 https://t.co/AFpw1wsrNt
— Variety (@Variety) November 11, 2023
लँडगार्ड यांच्या निधनाबद्दल अभिनेते पॉल पीटरसन यांनी फेसबुकवर शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “या आठवड्याच्या सुरुवातीला कर्करोगाने तिचा जीव घेतला. द डोना रीड शो मधील लँडगार्ड ही माझी सर्वोत्कृष्ट टीव्ही मैत्रीण होती. जेनेट दिसायला सुंदर होतीच पण ती मनानेही सुंदर होती. आम्ही कितीही दूर असलो तरीही कायम संपर्कात होतो.” लँडगार्ड यांच्या निधनाने हॉलिवूड मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. (The Swimmer fame actress Janet Landgaard passed away)
आधिक वाचा-
–सो ब्यूटीफुल…, काळजात घंटी वाजावी असा आहे अनन्या पांडेचा लूक; एकदा पाहाच
–रजनीकांतने चाहत्यांना दिली खास भेट; दिवाळीच्या मुहूर्तावर ‘लाल सलाम’चा टीझर प्रदर्शित










