Thursday, April 24, 2025
Home वेबसिरीज प्रेक्षकहो प्रतीक्षा संपली! बहुप्रतिक्षित ‘फॅमिली मॅन २’ वेब सीरिज लवकरच होणार प्रदर्शित; पाहा टिझर

प्रेक्षकहो प्रतीक्षा संपली! बहुप्रतिक्षित ‘फॅमिली मॅन २’ वेब सीरिज लवकरच होणार प्रदर्शित; पाहा टिझर

बहुप्रतिक्षित ‘फॅमिली मॅन 2’ ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवरील या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. प्रेक्षक या सीरिजची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सीरिज 4 जून, 2021 रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी ट्वीट करून या सीरिजचा टिझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये असे दाखवले आहे की, सर्वजण मनोज वाजपेयी म्हणजेच श्रीकांत तिवारीला शोधत आहेत. परंतु तो कुठेतरी गायब झाला आहे. हा टिझर पाहता या सीरिजचा दुसरा सिझन देखील खूप मजेशीर असणार आहे, असा अंदाज सर्वजण बांधत आहेत. यातील खास गोष्ट म्हणजे ही सीरिज हिंदी, तमिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या सोबतच ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने ट्वीट करून ही माहिती दिली आहे की, या सीरिजचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे आणि उद्या काहीतरी मोठा धमाका होणार आहे. तसेच ऍमेझॉनने या सीरिजचा पोस्टर देखील प्रदर्शित केला आहे. सोबत त्यांनी लिहिले आहे की, “उद्या काहीतरी असा धमाका होणार आहे ज्याबद्दल आपण कधीच विचार केला नाहीये.”

खरं तर फॅमिली मॅन सीरिज या वर्षी 12 फेब्रुवारीला‌ प्रदर्शित होणार होती. परंतु तांडव आणि मिर्झापूर यांच्यावरून झालेल्या वादामुळे सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या सीरिजचा पहिला सिझन 20 सप्टेंबर, 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक आता दुसऱ्या सीजनची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

‘फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत मनोज बाजपेयी, शारीब हाशमी, प्रियमनी, शरद केळकर आणि धन्वंतरी हे असणार आहेत. राज एँड डी.के. या सीरिजचे निर्माते आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, पहिल्या सिझन प्रमाणेच सीजनला भरभरून यश मिळेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

-जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

हे देखील वाचा