Thursday, August 7, 2025
Home मराठी ‘फॅंड्री’, ‘सैराट’ अन् ‘नाळ’नंतर नागराज मंजुळेंनी केली आगामी चित्रपटाची दणाणून घोषणा; पाहा टीझर

‘फॅंड्री’, ‘सैराट’ अन् ‘नाळ’नंतर नागराज मंजुळेंनी केली आगामी चित्रपटाची दणाणून घोषणा; पाहा टीझर

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचे चित्रपट हे गणित नेहमीच काहीतरी हटके उत्तर देत असत. नागराज मंजुळे यांनी साकारलेल्या ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांमधून सिनेसृष्टीमध्ये एक अनोखा इतिहास घडवला आहे. त्यांच्या चित्रपटांचे विषय आणि त्यातील कलाकार ते एवढ्या चतुराईने निवडतात की, चित्रपट हिट झाल्याशिवाय राहतच नाही. अशात त्यांच्या एका नवीन चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

फॅन्ड्री आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर आता नागराज मंजुळे यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या नवीन चित्रपटाच्या टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे या चित्रपटाचे नाव देखील एकदम हटके असून, ते नाव ‘घर बंदूक बिर्यानी’ असे आहे. टीझरची सुरुवात ही लक्षवेधी आणि हटके संगीताने होत आहे.

यामध्ये सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच पटकथा लेखन हेमंत अवताडे यांनी केले आहे. टीझरमध्ये जो लक्षवेधी आवाज ऐकू येत आहे तो मोहित चौहान या गायकाचा आहे. तसेच संगीत ए.व्ही.प्रफुलचंद्र यांनी दिले आहे.

सध्या सोशल मीडियावर या टीझरचीच चर्चा सुरू आहे. तसेच यावर अनेकांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. यामध्ये एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही टीझर पण असा दणकून टाकताना… कडकच…” तसेच दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “‘झुंड’चे काय झाले? कधी प्रदर्शित होणार आहे?” या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु एक वर्षापासून चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच आता ‘घर बंदूक बिर्यानी’ चित्रपटाचा टीझर पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहून यामध्ये एका व्यसनाधीन व्यक्तीची कहाणी असल्याचे म्हटले जात आहे. साल २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच भारी! झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रोहित आणि कॅटरिनाची ‘ग्रॅंड एन्ट्री’

-‘आज कॅप्शन नाही सुचलं का?’, म्हणत रुपालीच्या फोटोवर चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले हटके प्रत्युत्तर

-अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहती फिदा; म्हणाली, ‘खूप गोड दिसतेस नजर…’

हे देखील वाचा