अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. तर तो सध्या नेहमीच चर्चा असते आणि आता तो त्याच्या आगामी चित्रपट भूत बंगला यासाठी चर्चेत आला आहे. भूत बंगला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेत असून पूजा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटात केवळ एक भयानक, विनोदी कथाच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आदरणीय दिग्दर्शक-अभिनेता जोडी, प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांचे 14 वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन देखील आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार (Kumar)या जोडीने आता पर्यत जे चित्रपट दिले आहेत ते सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. तर बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित, “भूत बांगला” हा चित्रपट तयार होत आहे. आणि टीझर प्रदर्शित होण्यापूर्वी, अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. अक्षयने चाहत्यांच्या स्क्रीनिंगद्वारे या हॉरर-कॉमेडीचा ‘एक्सक्लुझिव्ह फर्स्ट लूक’, ‘स्पेशल प्रिव्ह्यू’ प्रदर्शित केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाच्या भयानक पण मजेदार जगाची पहिली झलक मिळाली आहे. उर्वरित जगाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर केली आहे.
चित्रपटाचे पहिले गाणे, “राम जी आके भला करेंगे”, यामुळे चर्चा रंगली आहे. या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे केवळ चित्रपटाच्या मजेदार जगाची ओळख करून देते, प्रियदर्शन आणि अक्षयच्या भूतकाळातील सहकार्याच्या सोनेरी दिवसांची आठवण करून देते. चित्रपटातील स्टारकास्ट हा एक प्लस पॉईंट आहे. अक्षय कुमार वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत दिसणार आहे. तर 10एप्रिल 2026 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रसिद्ध अभिनेते थक्काली श्रीनिवास यांचे निधन, संगीतापासून फिल्म मेकिंगपर्यंत उमटवली छाप










