Saturday, June 29, 2024

‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: ज्योतिराव-सावित्रीमाईंच्या संघर्षमय गाथेची झलक पाहाच

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सत्यशोधक‘ चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी (22 डिसेंबर) पुण्यात भव्यदिव्य पद्धतीने लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये उपस्थिती लावली. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

‘सत्यशोधक’ (satyashodhak) चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे महात्मा फुले आणि सावित्रीमाईंच्या अनेक अज्ञात पैलूंची उलगड या ट्रेलरमध्ये होते. यामुळे चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

यावेळी ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ, सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे, कार्यकारी निर्माते शिवा बागुल आणि महेश भारंबे, चित्रपटाचे संगीतकार अमितराज, गायिका वैशाली सामंत, गायिका आरती केळकर, कास्टिंग डिरेक्टर संदीप जोशी यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर म्हणाले, “‘सत्यशोधक’ हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची एक अनोखी झलक प्रेक्षकांना देईल. या चित्रपटाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”

या चित्रपटात महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे. या चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. (The trailer release of the movie Satyashodak tells the story of Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule)

आधिक वाचा-
‘मिर्झापूर’मध्ये अत्यंत सोज्वळ दिसणारी ‘कालीन भैय्या’ची सून खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, पाहून चाहतेही फिदा
बाेल्ड ड्रेसमध्ये काजलच्या ग्लॅमरस लूकने निर्माण केली दशहत; चाहते म्हणाले…

हे देखील वाचा