Saturday, June 29, 2024

“आमच्या घरी गणपती बसत नाही..”, क्रांतीने शेअर केला जुळ्या लेकींचा ‘तो’ व्हिडिओ, चाहते म्हणाले…

मंगळवारी संपुर्ण भारतातील घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात आनंदाचे वातावर निर्मीण झाले आहे. आपला भारत देश रूढी आणि परंपरा या नुसार चालतो. नुकतेच गणपती बाप्पाचे आगमन झाले, पण काही लोकांच्या घरी परंपरेनुसार गणपती बाप्पाचे आगमन झाले नाही. प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी देखील गणपती बसत नाहीत. या दरम्यान तिने खास व्हिडीओ शेअर केला आहे.

क्रांतीला झिया आणि झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. पण ती त्यांना छबिल आणि गोदो अशी हाक मारते. क्रांती त्यांना नेहमी सणांविषयी माहिती देत असते. या व्हिडिओमध्ये तिच्या दोन्ही मुली गणपती बाप्पाची आरती गाऊन गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करत आहेत.

हा व्हिडिओ (Kranti Redkar Video) शेअर करताना क्रांतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्‍या घरी गणपती बसत नाही. पण लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच असत. ही मूर्ती मला ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या शूट दरम्यान नेहा पाटीलने भेट म्हणून दिली होती.ता हा बाप्पा आमच्या छबिल गोदोचा खास मित्र झाला आहे. णपती बाप्पा मोरया!! तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!”

क्रांतीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “तुझ्या दोन्ही मुली किती गोड आहेत.” दुसऱ्याने लिहिले की,“गोड मैत्री…”तर आणखी एकाने लिहिले की, “या दोघींना नक्कीच बाप्पा पावणार.”

दरम्यान, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांनी 2017 मध्ये लग्न केले होते. दोघेही एकत्र शिकले होते आणि त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. क्रांती नेहमी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. क्रांतीने अनेक लोकप्रिय मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. समीर वानखेडे हे आयकर विभागातील अधिकारी आहेत. त्यांनी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती. (The video of Kranti Redkar’s twin daughters singing a special aarti for Bappa is in discussion)

अधिक वाचा-
सामंथा आणि नागा चैतन्य यांचे पॅचअप? अभिनेत्रीने लग्नाचे फोटो केले अनअर्काइव्ह
‘त्याने प्रसिद्धीसाठी माझा वापर केला’, राखी सावंतने आदिल दुर्रानी विरोधात शेअर केले पुरावे

हे देखील वाचा