Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड प्रेक्षकांचा थिएटरमध्ये राडा, सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडून घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

प्रेक्षकांचा थिएटरमध्ये राडा, सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडून घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

दिवाळीच्या निमित्ताने सलमान खानच्या चित्रपटाचे प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मालेगावमधील मोहन चित्रपटगृहात फटाके फोडून गोंधळ घातला. यामुळे चित्रपटमध्येच बंद करावा लागला. दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना लक्ष्मीपूजनच्या दिवशी सलमान खानच्या चाहत्यांनी येथील मोहन चित्रपटगृहात थेट फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3‘ अखेर 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रविवारी रात्री मोहन चित्रपटगृहात सलमान खानच्या ‘टायगर 3‘ या चित्रपटाचा शो होता. नेहमीप्रमाणे चित्रपटाला चाहत्यांची चांगलीच गर्दी होती. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही चाहत्यांनी वेगवेगळे फटाके फोडण्यास सुरुवात केली.

रॉकेट्सही सोडले गेले. यामुळे इतर प्रेक्षकांची धांदल उडाली. जवळपास 10 मिनिटे बॉम्ब, रॉकेट्स, फुलझाड व तत्सम फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बाल्कनीतील प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत त्याचे समर्थन करीत होते. या घटनाक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच रात्री साडेअकरा वाजता पोलीस चित्रपटगृहात दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाचा बंबही पोहोचला.

गर्दीत संशयितांना ओळखणे अवघड झाले होते. या गोंधळामुळे काही प्रेक्षक आधीच बाहेर पडले होते. हुल्लडबाजी टाळण्यासाठी अखेर शो बंद करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याच चित्रपटगृहात गेल्या महिन्यात शाहरुख खानच्या चित्रपटावेळी अशीच हुल्लडबाजी प्रेक्षकांनी केली होती.

 या घटनेचे मुख्य कारण म्हणजे सलमान खानच्या चाहत्यांचा उत्साह. चित्रपटाच्या सुरुवातीला फटाके फोडणे हा एक प्रकारचा उत्सव साजरा करण्याचा प्रकार आहे. मात्र, यामुळे इतर प्रेक्षकांची धांदल उडते आणि चित्रपटाचा आनंद घेणे कठीण होते. याशिवाय, फटाके फोडल्याने आग लागण्याचा धोका देखील असतो. यासारख्या हुल्लडबाजी टाळण्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापनाने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

आधिक वाचा-
वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…
घटस्फोट झाल्यावरही एकमेकांच्या प्रेमात गुंतले बॉलीवूडचे ‘हे’ जोडपे; एकदा वाचाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा