Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारने सर्वांसमोर उडवली कपिल शर्माची खिल्ली! म्हणाला, ‘लॉकडाउनमध्ये दोन मुलं कोणाचे जन्माला आले?’

अक्षय कुमारने सर्वांसमोर उडवली कपिल शर्माची खिल्ली! म्हणाला, ‘लॉकडाउनमध्ये दोन मुलं कोणाचे जन्माला आले?’

आज सर्वांच्याच उत्कटतेला पूर्णविराम मिळणार आहे. कारण पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’ आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. हा शोचा तिसरा सीझन असून, तो आजपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. कपिल शर्माच्या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या नवीन सीझनचा पहिला पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार आहे. अक्षय त्याच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असून, त्याच्यासोबत हुमा कुरेशी, वाणी कपूर आणि जॅकी भगनानी हे देखील कपिलच्या शोमध्ये येणार आहेत.

‘द कपिल शर्मा शो’च्या प्रत्येक भागाप्रमाणे हा भाग देखील धमाकेदार असणार आहे, जिथे अक्षय कुमार कपिलच्या संपूर्ण टीमसोबत मस्ती करताना दिसून येणार आहे. या शोचा एक नवीन प्रोमो आला असून, यामध्ये कपिल अक्षय कुमारला त्याच्या कामासाठी टोमणे मारतो. त्यानंतर अक्षय त्याची खूप चेष्टा करतो.

या प्रोमोमध्ये कपिल शर्मा प्रेक्षकांना आणि अर्चना पूरन सिंग यांना म्हणतो की, “वर्षातील ६६५ दिवस काम करतो, म्हणजे सर्वात जास्त काम करणारा अभिनेता.” त्यावर उत्तर देत अक्षय कुमार म्हणतो की, “म्हणजे मी एकटाच काम करतो का? तुम्ही लॉकडाऊनमध्ये काम केले नाही का?” तर उत्तर देत कपिल म्हणाला की, “लॉकडाऊनमध्ये आमचा शो बंद होता.” तर मजेशीर अंदाजात उत्तर देताना अक्षय म्हणाला की, “दोन मुलं कोणाचे जन्माला आले.” त्यानंतर संपूर्ण प्रेक्षक आणि अर्चना पूरन सिंग मोठमोठ्याने हसायला लागतात.

 

कपिलच्या शोमध्ये अक्षयसोबत हुमा कुरेशी आणि वाणी कपूरही येणार आहेत. तर कपिल हुमाची स्तुती करत म्हणतो की, “मी ‘महाराणी’ बघितला आहे, तू त्यात उत्कृष्ट काम केले आहेस. तरीही तू मला भाऊ म्हणतेस.” कपिलला उत्तर देत हुमा म्हणते की, “ठीक आहे. आज मी तुला भाऊ म्हणणार नाही.” तर लगेच कपिल म्हणतो, “बस माझासाठी फक्त एक दिवस पुरेसा आहे.”

कपिल पुढे व्हिडिओमध्ये म्हणतो की, “तुम्ही सगळे सोशल मीडियावर आहात आणि काही ना काही पोस्ट करत असता. तुमच्या चाहत्यांकडून हजारो कमेंट येतात. त्यातून आम्ही काही मजेदार कमेंट्स आणल्या आहेत.” त्याने अक्षय कुमारचा फोटो दाखवला. त्या पोस्टला कॅप्शन होते की, “जेव्हा तुम्हाला माहित असेल की २५ दिवसात पैसे डबल स्कीम.” एका चाहत्याने यावर कमेंट केली की, ‘भाऊ, मी २०० रुपये पेटीएम करत आहे ४०० करून दे.’

यावरूनच असे वाटते की, द कपिल शर्मा शोचा पहिला भाग दणक्यात होणार आहे. चाहते त्याच्या टेलिकास्टची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा