Wednesday, July 3, 2024

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

दिग्गज रंगभूमी कलाकार आणि दिल्लीमधील अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक जलबाला वैद्य यांचे ९ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये दुःखद निधन झाले आहे. त्या श्वसनाशी संबंधित आजाराने ग्रस्त होत्या. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी असलेल्या अनुसूया वैद्य शेट्टी यांनी दिली आहे.

लंडनमधील भारतीय लेखक आणि स्वत्रंत्रता सेनानी सुरेश वैद्य आणि इंग्लिश शास्त्रीय गायक मैज फ्रेंकीस यांच्या घरी जलबाला वैद्य यांचा जन्म झाला होता. त्यांनी एक पत्रकार म्हणून त्याच्या करियरची सुरुवात केली होती. सोबतच त्यांनी दिल्लीमधील अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रं आणि मासिकांमध्ये उत्तम लेख देखील लिहिले.

जलबाला वैद्य यांना संगीत नाटक अकादमीच्या टागोर पुरस्काराने, दिल्ली नाट्य संघ पुरस्कार आणि आंध्रप्रदेश नाट्य अकादमी सन्मान देऊन गौरवण्यात आले होते. यासोबतच त्यांना संयुक्त राज्य अमेरिकेच्या बाल्टीमोर शहराची मानद नागरिकता देखील देण्यात आली होती. दिल्ली सरकार कडून देखील त्यांची कारकीर्द आणि त्यांचे योगदान पाहून त्यांना फेब्रुवारीमध्ये एक वरिष्ठ सन्मानाने गौरविलेले गेले होते.

जलबाला यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक सीपी रामचंद्रन यांच्याशी लग्न केले होते. मात्र काही काळाने ते वेगळे झाले. पुढे त्यांची भेट कवी नाटककार असणाऱ्या गोपाल शरमन यांच्याशी झाली आणि त्यांनी लग्न केले.

जलबाला यांनी त्यांच्या नाट्य जीवनाची सुरुवात १९६८ साली ‘फुल सर्कल’सोबत केली. हे कविता आणि गोष्टींचे नाट्य रूपांतर होते. हे नाटक त्यांच्या पहिलीच यूरोप दौऱ्यात यशस्वी झाले. गोपाळ शर्मन यांनी २५ कलाकारांसाठी एक नाटक लिहिले होते. मात्र हे नाटक एका स्त्रीच्या अभिनयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. यात जलबाला वैद्य यांनी सर्वच पात्रांना ‘कथा’वे आधारित शैलीमध्ये निभावले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा