Monday, June 9, 2025
Home अन्य ‘कौन बनेगा करोडपती’च्या या पर्वात शोमध्ये झाले पाच मोठे बदल, शोमध्ये ह्यावेळेस झाली ‘धुक-धूकी जी’ की एंट्री

‘कौन बनेगा करोडपती’च्या या पर्वात शोमध्ये झाले पाच मोठे बदल, शोमध्ये ह्यावेळेस झाली ‘धुक-धूकी जी’ की एंट्री

पूर्वी टेलिव्हिजनला नेहमी चित्रपटांपेक्षा कमी लेखले जायचे. मात्र काळ बदलला तसे टीव्ही इंडस्ट्री चित्रपटांच्या तोडीस तोड पुढे आली आणि या इंडस्ट्रीला देखील चित्रपटांएवढेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, सलमान खान पासून, माधुरी दीक्षित, करीना कपूरपर्यंत सर्वच बडे कलाकार टीव्हीवर झळकत आहेत. अमिताभ बच्चन यांना तर ‘कौन बनेगा करोडपती’ शोने एक वेगळी आणि मोठी ओळख मिळवून दिली. या शोने आजपर्यंत अनेक लोकांना करोडपती बनवले आहे. शोचे नवनवीन पर्व घेऊन दरवर्षी महानायक अमिताभ बच्चन टीव्हीवर अवतरतात. अमिताभ बच्चन मागील २० वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. यावर्षी देखील ते प्रेक्षकांना भेटायला येण्यासाठी सज्ज झाले आहे.

लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा नवीन सिझन सुरु होत आहे. प्रोमोंमधून नक्कीच लक्षात येत आहे की, ह्या पर्वात प्रेक्षकांना अनेक बदल पाहायला मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार या गेममधे पाच मोठे आणि महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या लेखातून जाणून घेऊया केबीसीच्या या पर्वात नक्की काय काय बदल केले गेले आहे. (these 5 changes kbc 13)

केबीसीच्या हॉटसीटवर पोहचण्यासाठी स्पर्धकांना खेळावे लागणारे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट हे या पर्वात दिसणार नाही. त्याऐवजी ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट- ट्रिपल टेस्ट’ हे असणार आहे. यात स्पर्धकांना तीन प्रश्न विचारले जाणार तिन्ही पारशांचे कमीतकमी वेळात उत्तर देणारा स्पर्धक हॉटसीटवर जाईल.

शो मध्ये असणारी लाईफलाईनमध्ये देखील बदल करण्यात आले आहे. शोमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असल्याने शोमध्ये ‘ऑडियंस पोल’ लाईफलाईन पुन्हा दिसणार आहे. ‘वीडियो ए फ्रेंड’ ही लाईफलाईन वगळण्यात आली आहे. या पर्वात प्रत्येक शुक्रवार ‘शानदार शुक्रवार’ म्हणून साजरा केला जाईल. या खास भागात अनेक सेलिब्रिटी शोमध्ये येतील. यासोबतच खेळात असणाऱ्या टायमरचे नाव ‘धुक-धूकी जी’ठेवण्यात आले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा