Wednesday, July 3, 2024

अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत गाजतोय ‘या’ ९ कलाकारांचा डंका; निर्माते करतात कोट्यवधींची उधळण

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठ- मोठे कलाकार आहेत, जे अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मालिकांमध्ये अभिनय करत अनेक कलाकारांनी चाहत्यांच्या मनावर आपली दमदार पकड बनवली आहे. अशात या कलाकारांना आपल्या मालिकेत घेण्यासाठी अनेक निर्माते त्यांना कोटींच्या घरात मानधन देण्यास देखील तयार आहेत.

यामध्ये श्वेता तिवारीपासून ते हिना खानपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. या लेखातून आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया…

राम कपूर
साल १९९८ मध्ये राम कपूर यांनी ‘हीना’ या मालिकेमधून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमध्ये देखील ते झळकले होते. साल २०११ मध्ये आलेली मालिका ‘बडे अच्छे लगते है’ मधून ते घराघरात पोहोचले. त्यांची लोकप्रियता आणि दमदार अभिनय पाहून निर्माते त्यांना हवी तेवढी रक्कम देण्यास देखील तयार होतात.

साक्षी तन्वर
साक्षी तन्वरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘कहाणी घर घर की’ या मालिकेतील पार्वती नावाने ती घराघरात पोहोचली. ‘कॉफी हाऊस’, ‘बावरा मन’, ‘दंगल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील ती झळकली आहे. लवकरच ‘पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटातून ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. साक्षीला देखील अनेक निर्माते हवे तेवढे मानधन देण्यास तयार असतात.

श्वेता तिवारी
अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतीच ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये झळकली होती. त्यावेळी तिचा बेधडक अंदाज सर्वांना आवडला. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेमधून ती प्रकाशझोतात आली. तिने ‘मिले ना मिले हम’, ‘आबरा का डाबरा’ अशा अनेक हिंदीसह नेपाळी, भोजपुरी, पंजाबी आणि उर्दूभाषिक चित्रपटांत काम केले आहे. आजही दिग्दर्शक त्यांच्या मालिकेमध्ये श्वेताला घेण्यासाठी तिला हवी तेवढी रक्कम देण्यास तयार असतात.

अर्जुन बिजलानी
अर्जुन छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावर देखील दमदार अभिनय साकारतो. त्याने आतापर्यंत अनेक शो, मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अभिनयात त्याने गाठलेले यशाचे शिखर पाहून अनेक निर्माते त्याला मालिकेमध्ये घेण्यासाठी उत्सुक असतात. तसेच त्यासाठी तो मागेल तेवढी रक्कम देण्यास देखील तयार होतात.

हिना खान
हिना खान कायमच तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत तिने दमदार अभिनय केला. प्रेक्षकांनी देखील तिच्या या अभिनयाला खूप पसंती दिली. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने दोन वेळा ‘गोल्ड’ पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे तिला देखील अनेक निर्माते हवे तेवढे मानधन देण्यास तयार आहेत.

करण कुंद्रा
करण कुंद्रा देखील छोट्या पडद्यावर झळकणारा एक मोठा अभिनेता आहे. ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेमधून त्याने त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. सध्या तो ‘बिग बॉस १५’मध्ये दिसत आहे. या शोमध्ये येण्यासाठी निर्मात्यांनी त्याला सर्वांपेक्षा जास्त रक्कम मानधन म्हणून दिल्याची चर्चा सुरू आहे.

रुबीना दिलैक
अभिनेत्री तिच्या अभिनयासह डान्समुळे देखील चर्चेत असते. तिची पहिली मालिका ‘छोटी बहू’ ही होती. पहिल्याच मालिकेमध्ये तिने यशाचे शिखर गाठले. ‘बरेली की बेटी’ या चित्रपटामध्ये देखील तिने अभिनय केला आहे. लवकरच ‘अर्ध’ या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या मालिकेमध्ये तिने काम करावे असे अनेक निर्मात्यांना वाटते. त्यासाठी ते तिला हवे तेवढे मानधन देण्यास देखील तयार असतात.

रुपाली गांगुली
‘भाभी’, ‘आपकी अंतरा’, ‘अदालत’ अशा अनेक मालिकांमध्ये रुपाली गांगुलीने दमदार अभिनय केला आहे. ‘बिग बॉस १’मध्ये देखील ती झळकली होती. सध्या ती ‘अनुपमा’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम मोजली आहे.

सिद्धार्थ शुक्ला
सिद्धार्थ शुक्ला सध्या आपल्यामध्ये नाही. परंतु त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्माते त्याला कोट्यवधी रुपये देण्यास देखील तयार होत होते.

‘बिग बॉस १३’ च्या विजेते पदाचा मान देखील त्याने पटकावला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

-कार्तिक आर्यन साकारणार जगातील सर्वात गरीब ‘प्रिन्स’, पुन्हा एकदा सोबत दिसणार ‘ही’ क्यूट जोडी

-‘वडिलांचे कर्म लपवण्यासाठी आईने आत्महत्या केली’, नीना गुप्ता यांचा आत्मचरित्रातून धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा