Wednesday, June 26, 2024

काय सांगता! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी दिलाय शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार

शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये बादशाह म्हटले जाते. त्याने आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. शाहरुखने बॉलीवूडमधील अनेक मोठं मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तो एवढा मोठा सुपरस्टार आहे, की प्रत्येकाचं त्याच्यासोबत काम करायचे आहेत. मात्र असे असूनही काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला होता.

शाहरुख खानचा आगामी ‘लायन’ हा चित्रपट नुकताच साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला ऑफर करण्यात आला होता. पण वैयक्तिक कारण सांगून तिने ह्या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे.

शाहरुख खानला पहिला ब्रेक हेमा मालिनी यांच्या ‘दिल आशना है’ या चित्रपटातून मिळाला होता. परंतु हेमाजी यांनी शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. कारण त्यांचे असे म्हणणे आहे की, शाहरुख खान अभिनयापेक्षा जास्त ओवर एक्टिंग करत असतो.

तसेच अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरला शाहरूखच्या अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या होत्या, परंतु तिने नेहमी किंग खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. कारण तिचे असे म्हणणे आहे की, मोठ्या पडद्यावर त्यांच्या दोघांची जोडी चांगली दिसणार नाही, म्हणून तिने आतापर्यंत किंग खानचे आलेल्या सर्व चित्रपटांची ऑफर तिने नाकारले आहेत.

 

यासोबत ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात राणीच्या आधी ट्विंकल खन्नाला टीनाच्या रोलसाठी विचारणा झाली होती, पण तिने या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता. या सिनेमाआधी बादशाह चित्रपटात तिने शाहरुखसोबत काम केले होते.

तसेच करिश्मा कपूरने शाहरुख खानसोबत काही चित्रपट केले आहेत. परंतु तिने देखील ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात किंग खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. अनुष्का शर्माच्या आधी कंगनाला शाहरुख खानच्या झिरो चित्रपटातील भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण कंगनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

बॉलीवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला ‘डर’ या चित्रपटात जुही चावलाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र श्रीदेवीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. आधी त्या दोघांनी ‘आर्मी’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

हेही नक्की वाचा-
प्रिया मराठे आकाशी घागरा-चोळीमध्ये दिसतेय फारच सुंदर; पाहा फोटो
अदिती राव हैदरी वयाच्या 17व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट, आमिर खानसोबतही आहे खास नाते

हे देखील वाचा