सामान्य लोकांना नेहमीच कलाकारांचे आयुष्य सुखावह आणि आलिशान वाटत असते. या क्षेत्रात भरपूर पैसा, प्रसिद्धी, नाव मिळत असल्याने अनेकदा सामान्यांना कलाकारांच्या आयुष्याचा खुप हेवा वाटतो. त्यांचे जीवन किती सुसह्य आणि चांगले असते हा विचारही त्यांच्या मनात डोकावून जातो. मात्र आपण हा विचार नाही करत की आपल्याला जेवढे दिसते त्यावरून आपण त्यांच्या जीवनाबद्दल विविध तर्क लावतो, पण त्याव्यतिरिक्त देखील त्यांचे एक जग आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे जे आपल्या समोर कधीही येत नाही. सामान्य स्त्रियांप्रमाणे अभिनेत्रींच्या आयुष्यात देखील अनेक समस्या असतात. त्यांना देखील वेगवेगळ्या वैवाहिक समस्यांना सामोरे जावे लागते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींनी घरगुती हिंसाचाराचा सामना केला आहे. आज या लेखातून जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रीची नावे.
श्वेता तिवारी :
टीव्ही क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. मात्र या लग्नात तिला खूप त्रास झाला. तिने राजावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आणि घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. मात्र इथेही तिला याच त्रासाला सामोरे जावे लागले. आता ती सिंगल मदर असून तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.
रश्मी देसाई :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील नावाजलेले नाव म्हणजे रश्मी देसाई. रश्मीने अभिनेता नदीशी सिन्धुसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर चार वर्षांनी तिने घटस्फोट घेतला. एका मुलाखतीमध्ये रश्मीने लग्न तुटण्याचे कारण घरगुती हिंसा असल्याचे सांगितले होते.
डिंपी गांगुली :
एका रियॅलिटी शोमधून डिंपीने राहुल महाजनसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचा मोठा गाजावाजा देखील झाला. मात्र लग्नानंतर डिंपीने राहुलवर मारहाणीचे आरोप लावले. इतकेच आंही तर तिने मीडियासमोर येत तिच्या जखमा देखील दाखवल्या होत्या.
दलजित कौर :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ओळखीचा चेहरा असणारी दलजित देखील घरगुती हिंसाचाराला बळी पडली आहे. तिने २००९ मध्ये टीव्ही अभिनेता असणाऱ्या शालीन भनोटसोबत लग्न केले होते. मात्र २०१५ साली ते वेगळे झाले. दलजितने शालिनवर मारहाणीचा आरोप केला होता.
ऋचा गुजराती :
अभिनेत्री ऋचा गुजरातीने मितुल सिंघवीसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर तिने मितुल आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचारासोबत इतर आरोप केले आणि घटस्फोट घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली होती ‘ही’ अभिनेत्री, वाचा एका माचिसच्या काडीने कसा घेतला जीव
–अल्लू अर्जुन अडकला अडचणीत, अपमानकारक जाहिरातीमुळे तेलंगणा सरकार पाठवणार नोटीस