Sunday, July 14, 2024

सलमानबरोबर ऑनस्क्रीन काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रींनी बॉलीवूडला केले टाटा-बायबाय, आज करतायत…

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्यासोबत काम करणं म्हणजे एक पर्वणीच जणू… अनेक अभिनेत्रींना सलमान सोबत एक तरी सिनेमा करायची इच्छा असतेच. कारण सलमान सोबत सिनेमा म्हणजे तो हिट होणार हे नक्की! त्यामुळे नव्वदीच्या दशकात आणि आताच्या काळात जितक्या काही नायिका झाल्या आणि आहेत त्यातल्या प्रत्येकीला सलमान सोबत काम हे करावंसं वाटतंच. उलट सलमानने स्वतःच अनेक कलाकारांना चित्रपटांमध्ये संधी देऊन त्यांच्या करियरला एक वेगळीच कलाटणी दिली आहे. सलमानच्या नव्वदीच्या दशकातील चित्रपटांकडे आपण जर पाहिलं तर त्याच्या सोबत ज्या ज्या नायिका झळकल्या त्यातील बऱ्याचश्या आज बॉलिवूडपासून कोसो दूर आहेत. चला तर मग आज आपण या अभिनेत्रींची नावं जाणून घेऊयात.

चांदनी

सनम बेवफा या चित्रपटात अभिनेत्री चांदनी सलमान खान सोबत दिसली होती. चांदनीचे खरे नाव नवोदिता शर्मा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला पण चांदनीच्या कारकिर्दीला त्याचा काही फायदा झाला नाही. आज ती बॉलिवूडपासून दूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदनी आता परदेशात असून तिथल्या मुलांना नृत्य शिकवते.

कांचन

सनम बेवफा या चित्रपटात अभिनेत्री कांचन देखील दिसली होती. कांचनने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. यासह तिने नव्वदीच्या दशकात अक्षय कुमार आणि गोविंदासोबत देखील काम केलं आहे. कांचन आज असं आयुष्य जगत आहे. ज्यात ती कुठे आहे याबद्दल कुणालाच काही माहिती नाही.

रंभा

सलमान खानबरोबर रंभाची जोडी हिट ठरली होती. जुडवा या चित्रपटात सलमान आणि रंभा यांना एकत्र प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. जुडवाशिवाय ती बॉलिवूडच्या आणखीन काही चित्रपटांमध्ये दिसली होती. यासह तिने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता रंभा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून तिचे फोटो शेअर करत असते परंतु तरी देखील ती लाईमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते.

रेणू आर्या

सलमान खानचा पहिला चित्रपट ‘बिवी हो तो ऐसी’मध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री रेणू आर्या देखील होती. याशिवाय रेणू फक्त एक-दोन चित्रपटांत दिसली, त्यानंतर तिने बॉलिवूडला कायमचा राम राम केला आणि अचानक गायब झाली ती पुन्हा कधी दिसलीच नाही. नुकतंच काही वर्षांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार ती नोएडामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहत आहे.

पूजा डडवाल

पूजा डडवाल काही काळापूर्वी आजारपणामुळे चर्चेत आली होती. तिने सलमानबरोबर वीरगती चित्रपटात काम केलं होतं. पूजाने सलमानकडे तिच्या उपचारासाठी मदत मागितली होती. जेव्हा सलमानला तिच्या आजारपणाबद्दल कळालं तेव्हा तो स्वतः तिच्या मदतीसाठी पुढे धावून आला होता.

हे देखील वाचा