Saturday, July 6, 2024

आज जागतिक वडापाव दिन! पाहा कोणत्या कलाकाराला काय खाणे आहे पसंत?

बॉलिवूड कलाकार त्यांच्या फिट बॉडीसाठी ओळखले जातात. ज्यासाठी त्यांना जिम करावी लागते. त्याचबरोबर निरोगी आहार घ्यावा लागतो. पण असे नाही की हे कलाकार स्ट्रीट फूडपासून दूर राहतात. सामान्य लोकांप्रमाणेच हे कलाकार स्ट्रीट फूड आवडीने खातात. पण ते शरीराची काळजी देखील घेत असतात. जागतिक वडापाव दिनी बॉलिवूड स्टार्सच्या आवडत्या स्ट्रीट फूडबद्दल जाणून घेऊया.

दीपिका पादुकोण
सुपरफिट अभिनेत्री दीपिका पादुकोणने सांगितले आहे की, तिचा आवडते स्ट्रीट फूड सेवपुरी आहे आणि ती बऱ्याचदा मुंबईतील सांताक्रूझमध्ये त्याचा आस्वाद घेण्यासाठी जात असते. (These are the gluttony of Bollywood, these artists love fast food)

रकुल प्रीत सिंग
रकुल प्रीत सिंग बाकी बॉलिवूड स्टार्सप्रमाणे तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. मागच्या काही काळापासून ती शाकाहारी झाली आहे आणि फक्त घरगुती पदार्थ खाते. पण तिने एका मुलाखतीत तिने सांगितले आहे की, स्ट्रीट फूडमध्ये तिला तळलेली भजी, मसाला चहा, कचोरी, मूग डाळ वडा खूप आवडतो.

सोनम कपूर
चित्रपटात येण्यापूर्वी सोनम कपूरचे वजन खूप जास्त होते. कारण ती मुंबईत बरेच स्ट्रीट फूड खायची. सोनमने एका मुलाखतीत सांगितले की, तिला पाणीपुरी, वडा पाव, डोसा, काठी रोल्स आणि सँडविच आवडतात आणि जुहूच्या वेगवेगळ्या दुकानांमध्ये तिने एकाच फेरीत या सर्व स्ट्रीट फूडचा आनंद घेतला आहे.

जान्हवी कपूर
जान्हवी कपूर अनेकदा तिच्या जिम फोटोशूटमुळे चर्चेत असते. ती तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेत असते. तिच्या आवडणाऱ्या जंक फूडबद्दल बोलायचे झाले, तर तिला पिझ्झा खूप आवडतो.

कॅटरीना कैफ

कॅटरीना कैफ बॉलिवूडमध्ये तिच्या चांगल्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिला पाया आणि कडक पाव खूप आवडतो. याशिवाय तिला सीफूड देखील आवडते आणि तिचे काही आवडते रेस्टॉरंट माहिम आणि जुहू बीचवर आहेत.

शाहरुख खान
दिल्लीत वाढलेल्या शाहरुख खानलाही स्ट्रीट फूडची आवड आहे. शाहरुखने सांगितले की, त्याला बंगाली मार्केटचे छोले भटुरे खूप आवडतात. या व्यतिरिक्त, त्याने सांगितले होते की, जेव्हा तो मुंबईत असतो, तेव्हा अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. तेव्हा ऑफिस जवळून मसाला डोसा आणि नारळाची करी मागवतो.

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. पण तिला तिच्या आईच्या हाताने बनवलेले व्हेज मोमोज आणि वर्सोवाची पाणीपुरी खूप आवडते. तर अनुष्काचा पती विराटला दिल्लीच्या अनेक पंजाबी लोकांप्रमाणे चोले भटुरे खूप आवडतात.

वरुण धवन
अभिनेता वरुण धवन गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक बनला आहे आणि आता तो जंक फूडपासून दूर राहतो. मात्र एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याला जुहू येथील दुकानातून चीज मसाला डोसा आणि टरबूज रस प्यायला खूप आवडतो.

 

कंगना रणौत
कंगना रणौतच्या चाहत्यांना आठवत असेल की तिने कसा क्वीन चित्रपटात एम्सटर्डमच्या मध्यभागी पणीपुरीचा स्टॉल लावला. पाणीपुरी कंगनाच्या आवडत्या स्ट्रीट फूडपैकी एक आहे. ‘पंगा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती दिल्लीत पाणीपुरी खातानाही दिसली होती.

हृतिक रोशन

हृतिक रोशनला इंडस्ट्रीमध्ये ग्रीक ग्रॉड म्हटले जाते आणि तो त्याच्या सिक्स पॅक ऍब्ससाठी प्रसिद्ध आहे. पण जेव्हा स्ट्रीट फूडचा प्रश्न येतो, तेव्हा हृतिकला कढईतून काढलेले गरमागरम समोसे खूप आवडतात. हृतिकने असेही म्हंटले होते की, तो एकावेळी खूप समोसे खाऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा