टिव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि प्रसिद्ध शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चे नवे पर्व लवकर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या शोचे १४ पर्व प्रसारित झाले आणि सर्वच तुफान गाजले. या शोचे १५ वे पर्व येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी देखील शोचा होस्ट म्हणून सलमान खानच दिसणार आहे. बर्याच दिवसांपासून या शोची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आतापर्यंत काही स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली असली, तरी बरीच नाव अद्यापही समोर आलेली नाहीत.
माध्यमातील वृत्तानुसार, शोचा टीआरपी वाढवण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला शोमध्ये घेण्यात येणार आहे. दरम्यान, रिया या शोमध्ये येण्यासाठी एका आठवड्याला ३५ लाख रुपये मानधन घेणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, आजपर्यंत या शोमध्ये आलेल्या कोणत्याही सेलिब्रिटीला इतके जास्त मानधन देण्यात आलेले नाही.
देवोलीना भट्टाचार्जी
टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ‘बिग बॉस १३’च्या पर्वात दिसली होती. त्यावेळी रश्मी देसाई आणि देवोलीना बेस्ट फ्रेंड झाल्या. माध्यमातील वृत्तानुसार, देवोलीनाला शो एका आठवड्यासाठी १० लाख रुपये मानधन घेत होती. देवोलीनाने टिव्ही मालिका ‘साथ निभाना साथिया’मध्ये ‘गोपी’ची भूमिका साकारली आहे. तिच्या या पात्राला प्रचंड लोकप्रिय मिळाली.
श्रीसंत
माजी क्रिकेटपटू श्रीसंत ही ‘बिग बॉस’चा स्पर्धक म्हणून शोमध्ये सहभागी झाला होता. तो हा शो जिंकण्यात यशस्वी झाला नाही. परंतु, त्यांच्यामुळे शोच्या निर्मात्यांना भरपूर टीआरपी मिळाला. या शोमध्ये श्रीसंत अनोख्या अंदाजात दिसला. त्यामुळे अनेक चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. तसेच ‘बिग बॉस १३’च्या पर्वामध्ये येण्यासाठी त्याला सुमारे ५० लाख रुपये मानधन दिले गेले होते.
रश्मी देसाई
टिव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने देखील ‘बिग बाॅस १३’च्या पर्वात सहभाग घेतला होता. त्यावेळी शोचा टीआरपी जबरदस्त वाढला होता. १३व्या पर्वातील अरहानसोबतचा रश्मीचा रोमान्स आणि सिद्धार्थ शुक्लासोबतचे भांडण या बद्दल बरीच चर्चा झाली. माध्यमातील वृत्तानुसार, रश्मीने संपूर्ण पर्वासाठी १.२० कोटी रुपये मानधन घेतले होते.
राहुल देव
राहुल देव हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्याने २००० साली हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राहुलला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर खलनायक पुरस्कारही देण्यात आला आहे. राहुल ‘बिग बॉस १०’च्या पर्वामध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी, त्याने २ कोटी रुपये मानधन घेतले होते.
हिना खान
टिव्ही इंडस्ट्रीत प्रसिद्ध सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हिना खान. ‘बिग बॉस ११’च्या पर्वात हिनाने एन्ट्री केली होती. हिना शोमध्ये उपविजेती झाली. परंतु, हिनाचे शोमध्ये येणे निर्मात्यांसाठी मोलाचे ठरले. हिना शोमध्ये आल्यानंतर शोच्या टीआरपीत प्रचंड मोठी वाढ झाली. या शोच्या निर्मात्यांनी हिनाला प्रत्येक आठवड्यासाठी ९लाख रुपये मानधन दिले.
पामेला एंडरसन
निर्माता आणि अभिनेत्री म्हणून पामेला एंडरसन ओळखले जाते. ती एक हाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पामेला ‘बिग बाॅस ४’च्या पर्वात दिसली होती. या घरात ती फक्त दोन ते तीन दिवस दिसली. परंतु, तिच्या येण्याने शोला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि टीआरपी देखील वाढला. माध्यमातील वृत्तानुसार, पामेला अडीच लाख रुपये देण्यात आले होते.
दीपिका कक्कड
टिव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’मधुन अभिनेत्री दीपिका कक्कडने घराघरात आपली ओळख निर्माण केली. दीपिका ‘बिग बॉस १२’च्या पर्वात दिसली होती. एवढेच नव्हे, तर दीपिका या शोची विजेती ठरली होती. ‘बिग बॉस’च्या घरात राहण्यासाठी दीपिकाने १४ ते १६ लाख रुपये मानधन घेतले होती. यानंतर शोची विजेती झाली आणि तिला ५० लाख रुपये मिळाले होते.
सिद्धार्थ शुक्ला
‘बिग बॉस १३’च्या पर्वात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने प्रचंड क्रेझ निर्माण केली होती. शोमधील सिद्धार्थ आणि शहनाज गिलचा रोमान्स त्यावेळी खूप चर्चेत होता. यांच्या रोमान्सने चाहत्यांना वेड करुन सोडल होते. त्यावेळी सिद्धार्थने अनेक सेलिब्रिटींना पराभूत करुन हा खेळ जिंकला आणि चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. शोमध्ये येण्यासाठी सिद्धार्थने दर आठवड्याला ४० लाख रुपये मानधन घेतले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक