Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘या’ सुपरहिट चित्रपटांतून स्टार कलाकारांना अचानक दिला होता डच्चू; मराठमोळ्या अभिनेत्रीचाही समावेश

‘या’ सुपरहिट चित्रपटांतून स्टार कलाकारांना अचानक दिला होता डच्चू; मराठमोळ्या अभिनेत्रीचाही समावेश

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार‌ आहेत, ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत देखील घेतली आहे. मागच्या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अनेक चित्रपटांनी चित्रपटसृष्टीत त्यांचे रेकॉर्ड बनवले आहे. परंतु या चित्रपटात दिसणारे अनेक कलाकार या चित्रपटाची पहिली निवड नव्हते. हे चित्रपट सुरुवातीला दुसऱ्या कलाकारांना साईन केले होते. परंतु नंतर काही कारणास्तव त्या कलाकारांना बदलण्यात आले. चला तर जाणून घेऊया ते चित्रपट आणि कलाकार…

अर्जुन कपूर- कबीर सिंग
शाहिद कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘कबीर सिंग’ने अर्जुन कपूरच्या करिअरला एक वेगळे वळण दिले असते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अर्जुन कपूरचा विचार केला होता. याबाबत अर्जुन कपूरने स्वतः एका कार्यक्रमात सांगितले होते की, “ही गोष्ट तिथपर्यंत पोहोचली नव्हती, जिथे मला चित्रपट निवडण्याचा किंवा न निवडण्याचा पर्याय होता. त्यावेळी त्यांच्या मनात माझेच नाव होते. परंतु नंतर दिग्दर्शक संदीप वांगा शाहिदला भेटले आणि त्यांनी एकत्र चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. (These big actors were suddenly replaced from these hit films see the names here)

गोविंदा- जग्गा जासूस
‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या सेटवरून गोविंदा आणि रणबीर कपूरचे फोटो पाहून त्यांचे चाहते त्यांना एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. परंतु दुर्दैवाने या चित्रपटातील त्यांचा सीन कट करण्यात आला होता. रणबीर कपूरने सांगितले की, “दुर्दैवाने संपूर्ण ट्रॅक कट केला होता. परंतु यात माझी आणि बसूची चूक आहे. आम्ही हा चित्रपट स्क्रिप्ट पूर्ण होण्याआधीच सुरुवात केला होता. गोविंदा सारख्या महानायकाला कास्ट करणे आणि त्याच्या भूमिकेला न्याय न देणे हे खूपच बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.”

राधिका आपटे- विकी डोनर
आयुष्मान खुरानाचा पहिला चित्रपट ‘विकी डोनर’मधून अभिनेत्री यामी गौतम हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात यामीने ‘आशिमा’ हे पात्र निभावले होते. परंतु मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने खुलासा केला होता की, या पात्राच्या शर्यतीत तिच्या नावाचा देखील समावेश होता. परंतु तिच्या वजनामुळे तिला हे पात्र मिळाले नाही. राधिकाने सांगितले की, “मी एक महिन्यासाठी सुट्टीवर गेले होते. जिथे मी खूप बिअर पिली आणि खूप काही खाल्ले. मी त्यांना सांगितले होते की, मी परत आल्यावर वजन कमी करेल. परंतु त्यांना कोणताही चान्स घ्यायचा नव्हता.”

सैफ अली खान- रेस ३
‘रेस १’ आणि ‘रेस २’ या चित्रपटात रणवीरचे पात्र निभावणारा सैफ अली खानला फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटात सलमान खानसोबत रिप्लेस केले होते. सैफ अली खानने सांगितले की, “आम्ही ‘रेस ३’ जवळपास सोबतच केला होता. रमेश तौरानी यांनी जेव्हा चित्रपटातील मुख्य पात्र सलमान खानला‌‌ दिले, तेव्हा त्यांनी मला एक पार्ट ऑफर केला होता. पण काही कारणांनी मला तो करायला जमला नाही.”

तापसी पन्नू- पती पत्नी और वो
कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात भूमि पेडणेकर आधी तापसी पन्नूला कार्तिक आर्यन याच्या पत्नीच्या रोलसाठी विचारले होते. परंतु काही कारणांनी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत भूमि पेडणेकरला घेण्यात आले.

श्रद्धा कपूर- सायना
सायना नेहवाल हिच्यावर आधारित ‘सायना’ या चित्रपटात पहिल्यांदा श्रद्धा कपूरच्या लूकने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले होते. परंतु नंतर या चित्रपटात परिणीती चोप्रा हिला घेण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी सांगितले की, “श्रद्धा कपूर पूर्ण तयारीत होती. त्यामुळे आम्ही शूटिंग चालू केली होती. तिने सायनाची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, तसेच ती चांगले काम करत होती. परंतु तिला डेंग्यू झाला त्यामुळे ती खूप कमजोर झाली. तिने परत येण्याचा खूप प्रयत्न केला, पण नंतर तिला समजले की, ती खूप कमजोर झाली आहे.”

अली फजल आणि फातिमा सना शेख- भूत पोलीस
कॉमेडी हॉरर ‘भूत पोलीस’ या चित्रपटाची घोषणा करते वेळी चित्रपटात सैफ आली खानसोबत अली फजल आणि फातिमा सना शेख दिसले होते. परंतु नंतर त्यांच्या जागेवर अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार दिसले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयात २२ वर्षांचे अंतर असूनही अमिताभ यांचे खास मित्र होते आदेश; वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी झाला मृत्यू

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

हे देखील वाचा