Wednesday, June 26, 2024

सलमान, शाहरुख की आमिर? वाचा बॉलीवूडमधील पाच सर्वात श्रीमंत कलाकारांची एकूण संपत्ती

अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव आणि पैसा कमावला आहे. या क्षेत्रात आल्यावर स्वतःला कामाशी झोकून त्यांनी यश मिळवले आहे. एका नंतर एक सुपरहिट चित्रपट आणि अनेक जाहिरातींमधून या कलाकारांनी बक्कळ पैसा मिळवला आहे. काही कलाकारांची नावं तर फोर्ब्स इंडिया मॅगझीनच्या नावाजलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये येत असतात. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमधील खान मंडळी देखील अशा आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संपत्ती कमावली आहे.

रणवीर कपूर
आपल्या स्टाईलने सगळ्यांना आकर्षित करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे रणवीर कपूर. मागच्या वर्षी त्याने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. 2019 मध्ये त्यांनी 118.2 कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. त्याच्या एकूण संपत्तीबाबत मात्र अधिकृत कोणतीही माहित नाही. तरीही काही वेबसाईटनुसार त्याची एकूण संपत्ती ४००-५०० कोटींच्या आसपास आहे. 

आमिर खान
बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान लवकरच ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे. आमीर वर्षाला जेमतेम एखादा सिनेमाच करतो. २००१ सालापासून आमीरने केवळ २० ते २१ सिनेमात काम केले आहे. असे असले तरी आमीर एका सिनेमासाठीही बक्कळ मानधन घेतो.  २०१९ साली त्याने ८५  कोटी रुपये एवढी कमाई केली होती. त्याची एकूण संपत्ती १४५३ कोटी एवढी आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार हा बॉलिवूड‌मधील एक मात्र असा अभिनेता आहे, ज्याचं नाव फोर्ब्स ‘यूएसए’ च्या यादीत टॉप 10 मध्ये आहे. त्याने एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात केले आहे. सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमारचे नावं सहाव्या क्रमांकाला येते. त्याची एका वर्षाची कमाई म्हणजेच 1 जुन 2019 ते 1 जुन 2020 पर्यंतची कमाई 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटी रुपये एवढी होती. त्याच्याकडे एकूण 1935 कोटी रुपये एवढी संपत्ती आहे.

सलमान खान
सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानचेही नाव येते. सलमानने 2019 मध्ये एकूण 229.25 कोटी रुपये एवढी कमाई केली होती. 2020 मध्ये झालेल्या त्याच्या कमाईचा आकडा अजुन समोर आला नाही. त्याची एकूण संपत्ती 2197 कोटी रुपये एवढी असल्याचे बोलले जाते.

अमिताभ बच्चन
बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन अजूनही पडद्यावर छोटी मोठी काम करताना दिसतात. आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम कायम आहे. 2019 मध्ये त्यांनी 239. 25 कोटी रुपये एवढी कमाई केली होती. त्यांची संपूर्ण संपत्ती 2937 कोटी रुपये एवढी असल्याचे आकडे काही वेबसाईट्सने दिले आहेत. 

शाहरुख खान
‘झिरो’ या चित्रपटानंतर बॉलिवूडपासून लांब गेलेला शाहरुख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने 2019 या वर्षात 124.38 कोटी रुपये एवढी कमाई केली केली होती. 5320 कोटी रुपये एवढी त्याच्याकडे त्याची संपूर्ण संपत्ती आहे बॉलीवूडमधील तो सर्वात श्रीमंत कलाकार आहे.

हे देखील वाचा