Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड ऐश्वर्या राय बच्चनपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी १४ ते २० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये केला कमबॅक

ऐश्वर्या राय बच्चनपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी १४ ते २० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये केला कमबॅक

बॉलिवूडमध्ये अशा अनेक दिग्गज अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये खूप काही मिळवले. पण करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न केले आणि त्या इंडस्ट्रीपासून दुरावल्या. यापैकी काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी २० ते १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. चला तर मग या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया. 

जया बच्चन (jaya bachchan)

‘सिलसिला’ या चित्रपटानंतर अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी १९८१ मध्ये बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. यानंतर अभिनेत्रीने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाद्वारे तब्बल २० वर्षांनी पुनरागमन केले.

शिल्पा शेट्टी (shilpa shetty)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) २००७ मध्ये लग्न केल्यानंतर बॉलिवूडपासून दुरावली होती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर शिल्पाने २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’ या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक केले.

लारा दत्ता (lara dutt)

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) ३ वर्षांच्या ब्रेकनंतर अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटात पुन्हा दिसली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya roy bachchan) 

मुलगी आराध्याच्या जन्माच्या ४ वर्षांनंतर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने ‘जज्बा’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.

राणी मुखर्जी (rani mukharjee)

लग्नानंतर मुलीच्या जन्मानंतर ३ वर्षांनी अभिनेत्री राणी मुखर्जीने (Rani Mukherjee)२०१७ साली ‘हिचकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

माधुरी दीक्षित (madhuri dixit) 

अभिनेत्री ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit )१९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर माधुरीने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले. यानंतर, अभिनेत्रीने २००६ मध्ये ‘आजा नच ले’ चित्रपटाद्वारे सुमारे ८ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

दिव्या खोसला कुमार (divya khosala kumar)

अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने लग्नाच्या जवळपास १४ वर्षानंतर २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाद्वारे मोठे पुनरागमन केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

हे देखील वाचा