आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची बरीच चर्चा रंगली आहे. १७ एप्रिलला हे कपल लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आलियाने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे. आलियाचे वय आता २९ वर्षे आहे. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी लहान वयात लग्न केले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्यांनी लहान वयातच संसार थाटला.
नीतू कपूर (Neetu Kapoor)
आलियाची सासू नीतू कपूरने वयाच्या २१व्या वर्षी ऋषी कपूरसोबत सात फेरे घेतले. नीतू आणि ऋषी यांनी १९८० मध्ये लव्ह मॅरेज केले. नीतूने ऋषीसोबत लग्न केले, तेव्हा त्या इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्री होत्या, पण लग्नानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले. (these bollywood actresses got married at a young age)
डिंपल कपाडिया (Dimple Kapadia)
या यादीत डिंपल कपाडियाचेही नाव आहे. डिंपलने वयाच्या १६व्या वर्षी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले. याच काळात त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. दोघांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते. त्यावेळी डिंपल फक्त १६ वर्षांच्या होत्या. त्याचवेळी दोघांच्या वयात १६ वर्षांचा मोठा फरक होता.
भाग्यश्री (Bhagyashree)
‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री भाग्यश्रीची कथाही अशीच आहे. तिने वयाच्या २१व्या वर्षी तिचा प्रियकर हिमालयाशी लग्न केले. तिचे आणि हिमालयाचे शाळेच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते. भाग्यश्रीचे आई-वडील या नात्यासाठी तयार नव्हते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते.
दिव्या भारती (Divya Bharti)
या यादीत दिव्या भारतीच्या नावाचाही समावेश आहे. १९९२ मध्ये भारतीने बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवालासोबत लग्न केले. त्यावेळी ती १८ वर्षांचे होते. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर दिव्याचा मृत्यू झाला, ज्याचे रहस्य आजपर्यंत लोकांना माहिती नाही.
सायरा बानो (Saira Banu)
सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध जोडपे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे ११ ऑक्टोबर १९६६ रोजी लग्न झाले. त्यावेळी सायरा २२ आणि दिलीप ४४ वर्षांचे होते. वयाच्या १२ व्या वर्षी सायरा बानो दिलीप यांच्या प्रेमात पडल्या होत्या. २०२१ मध्ये दिलीप कुमार यांचे निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बबिता (Babita)
या यादीत बबिताच्या नावाचाही समावेश आहे. बबिताने वयाच्या २३ व्या वर्षी रणधीर कपूरसोबत लग्न केले. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. या लग्नासाठी रणधीरचे वडील राज कपूर यांनी एक अट ठेवली होती की, लग्नानंतर बबिताने अभिनय सोडला तर ते मान्य करतील. बबिता यांनी ही अट मान्य केली आणि ६ नोव्हेंबर १९७१ रोजी दोघांनी लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










