Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तुमच्या आवडत्या ‘या’ कलाकारांनी केले होते जाहिरातींमध्ये काम

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तुमच्या आवडत्या ‘या’ कलाकारांनी केले होते जाहिरातींमध्ये काम

बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकार आज आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावत आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अनेक छोट्या मोठ्या कामातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेकांनी चित्रपटातील सहाय्यक कलाकाराच्या भूमिका साकारल्या. प्रचंड संघर्ष आणि मेहनतीने कलाकारांनी आपली कारकीर्द घडवली.

आज चित्रपटसृष्टीत असे कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली. ज्यावेळी त्या कलाकारांनी जाहिरात केल्या त्यावेळी कोणालाच असे वाटले नसेल की, हे कलाकार भविष्यात प्रसिद्ध सुपरस्टार बनतील. आज आपण त्याच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरातींमधून केली.

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चनने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकला. तिचे नाव जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. १९९३ मध्ये ऐश्वर्या राय ‘कोको कोला’च्या जाहिरातीत काम केले. या जाहिरातीत आमिर खान तिच्यासोबत होता.

वरुण धवन

डेविड धवनचा धाकटा मुलगा वरूण धवनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण दणक्यात झाले. पण यासोबतच स्टारकिड्सबद्दल एक वेगळाच वाद सुरू होता. फार कमी लोकांना माहित आहे की, वरूण धवनने चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी अभिनयाचा अभ्यास केला आणि मॉडेलिंग देखील केले. याशिवाय वरूण लहान असताना त्याने बोर्नविटा जाहिरातीत काम केले.

दीपिका पदुकोण

आज दीपिका पदुकोण चित्रपट जगतातील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी एका चित्रपटासाठी सर्वात जास्त फी घेते. आज बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या दीपिका पदुकोणने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दीपिकाने प्रथम एक क्लोजअपची जाहिरात केली होती. नंतर तिला साबणाच्या जाहिरातीत कास्ट केले गेले.

सलमान खान

आज दबंग बनून बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या सलमान खानचा बॉलिवूड प्रवास अजिबात सोपा नव्हता. सूरज बडजात्या यांना भेटण्यापूर्वी सलमान खानलाही अनेक नकार पचवावे लागले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सलमान खानने टीव्हीमध्येही काम केले. त्याची पहिली टीव्ही जाहिरात लिम्का सॉफ्ट ड्रिंकची होती.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिचा चित्रपट जगताशी कोणताही संबंध नव्हता. तरीही तिने बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये आपले स्थान मिळवले आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला अनुष्काने दक्षिण भारतीय टीव्ही जाहिरातीत काम केले, जिथे तिने साबणाची जाहिरात केली होती.

सिद्धार्थ मल्होत्रा

‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा ​​मॉडेलिंग करायचा. त्या काळात त्याने पाँड्सची जाहिरात केली. या जाहिरातीवरूनच सिद्धार्थ मल्होत्राला ओळख मिळाली होती.

प्रीती झिंटा

बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रीती झिंटाने देखील तिच्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीतून केली. त्यावेळी प्रीती झिंटाला पर्क आणि लिरील साबणांच्या जाहिरातींसाठी ओळखले जायचे.

जिनिलिया डिसूझा

जिनिलियाने हिंदी चित्रपटांबरोबरच साऊथ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जिनिलिया फक्त १५ वर्षांची होती तेव्हा तिने तिचे पहिले टीव्ही कमर्शियल केले. पार्कर पेन्सच्या जाहिरातीमध्ये जिनिलिया पहिल्यांदा दिसली होती.

विद्या बालन

खूप कमी लोकांना माहित आहे की, विद्या बालनने मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी ‘हम पांच’ या मालिकेत केले होते. त्यानंतर विद्या बालनने ब्रेक घेतला आणि तिच्या पहिल्या टीव्ही जाहिरातीचे चित्रीकरण केले. तिची पहिली जाहिरात सर्फ एक्सेल वॉशिंग पावडरची होती.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा