Thursday, September 19, 2024
Home बॉलीवूड कधीकाळी फक्त चिकणवर ताव मारणारे ‘हे’ कलाकार आता झालेत शुद्ध शाकाहारी, कारणे वाचून व्हाल चकित

कधीकाळी फक्त चिकणवर ताव मारणारे ‘हे’ कलाकार आता झालेत शुद्ध शाकाहारी, कारणे वाचून व्हाल चकित

खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगळी असते. काहींना शाकाहारी जेवण आवडतं तर काहींना मांसाहाराचे वेड असतं. बॉलिवूड कलाकरांच्या बाबतीतही असेच घडते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकेकाळी हे कलाकार मांसाहाराचे प्रचंड शौकीन होते, आता ते शुद्ध शाकाहारी झाले आहेत. कोविड १९ महामारीनंतर काही लोकांनी हा निर्णय घेतला, तर काहींनी त्यांच्या चित्रपटातील पात्राच्या तयारी करण्यासाठी मांसाहार सोडला आणि आता शुद्ध शाकाहारी बनले आहेत. चला तर जाणून घेऊया असे कोणते बॉलिवूड कलाकार आहे.

रणवीर सिंग
माध्यमांतील वृत्तानुसार, रणवीर सिंगला(Ranveer Singh) पूर्वी मांसाहाराची खूप आवड होते. त्याला हैदराबादी आणि लखऊनवी मटणाचे पदार्थ खूप आवडत होते. एवढेच नाही तर एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर विमानातून प्रवास करत होता. फ्लाइटमध्ये मांसाहाराचे संपले होते. जेव्हा त्याला शाकाहारी खाणे ऑफर करण्यात आले तेव्हा रणवीरने साफ नकार दिला. पण आता तो पूर्ण शाकाहारी झाला आहे. सध्या ती शाकाहारी आहारावर आहे. रणवीरने त्याच्या आगामी ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील भूमिकेच्या मागणीनुसार त्याच्या शरीरात बदल करण्यासाठी वीगन आहार घेत आहे. रणवीर सिंग शाकाहारी झाल्यानंतर अलीकडेच त्याला एका जाहिरातीसाठी ऑफर देखील दिली होती.

भूमी पेडणेकर
बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरणवादी भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) लॉकडाऊन दरम्यान पूर्णपणे शाकाहारी झाली. खाद्यपदार्थांच्या बाबतीत झालेल्या या बदलामुळे तीही खूश आहेत. माध्यमांना दिलेल्या मुलाखती दरम्यान भूमीने सांगितले होते की, लॉकडाऊन दरम्यान तिला मनातून जाणवले आणि तिने मांसाहार सोडला. भूमी म्हणाली की, “मला अनेक वर्षांपासून मांसाहार सोडण्याची इच्छा होती, पण ते कठीण होत होते. पण, एक क्लाइमेट वॉरियर म्हणून माझ्या प्रवासाने मला खूप काही शिकवले आणि आता मला मांसाहार खाण्यांची इच्छा होत नाही.”

रितेश देशमुख
रितेश देशमुखनेही(Riteish Deshmukh) दोन वर्षांपूर्वी मांसाहार सोडले आहे. ही माहिती त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने सांगितले होते की त्याने मांसाहारी आहार, ब्लॅक कॉफी सोडली आहे. रितेश म्हणाला होता की,जेव्हा अवयव दान करण्याची वेळ येते तेव्हा लोक म्हणतील की त्यांनी निरोगी अवयव त्यांच्या वाटेवर सोडला आहे.

शिल्पा शेट्टी
आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने(Shilpa Shetty) २०२० मध्ये मांसाहार पूर्णपणे सोडून शाकाहाराकडे वळले. एका मुलाखती दरम्यान ती म्हणाली होती की, ‘तिला मांसाहार सोडणे कठीण जात होते. पण, आता यात सर्वात आश्चर्यकारक बदल जाणवत आहे. याबाबत शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली होती. ‘शाकाहार आपल्या आरोग्यासाठी आणि पृथ्वीच्या आरोग्यासाठी चांगला आहे’, असे ती म्हणाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

आर्या वाळवेकर ठरली अमेरिकेतली सर्वात सुंदर तरुणी, सोलापूर जिल्ह्याशी आहे खास कनेक्शन

धक्कादायक ! सर्वांचा लाडका ‘रॉजर’ देवाघरी गेला, चाहत्यांचे अश्रू थांबेना

शाहरुख खानच्या ‘त्या’ वागण्याने भडकले नेटकरी; पण आर्यन खानचं का होतंय कौतुक? एकदा वाचाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा