Wednesday, June 26, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ सेलिब्रिटींनी रशिया- युक्रेन युद्धावर सोशल मीडियावरून मांडले त्यांचे मत

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरातील लोक विचारात पडले आहेत. महायुद्ध सुरु होणार का असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून या हल्ल्याचे धडकी भरवणारे चित्रण आपल्याला दिसत आहे. रशियाकडून युक्रेनवर होणारे हल्ले सतत वाढत असून आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या १० लष्करी अधिकाऱ्यांसह १३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३१६ लोक जखमी झाले आहेत. या युद्धामुळे नक्की साधले जाणार आहे. हे युद्ध किती दिवस चालेल अजून यात किती जीवित आणि वित्तहानी होईल याबाबत अंदाज न बांधणेच योग्य अशी परिस्थिती दिसत आहे. या सगळ्यात बॉलिवूड कलाकारांनी देखील या युद्धावर त्यांचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे. 

सोनू सूद :
सोनू सूदने त्याच्या ट्वीटमधून भारतीय दूतावासांला विनंती करत लिहिले आहे की, “युक्रेनमध्ये १८००० भारतीय विद्यार्थी आणि अनेक कुटुंबे अकडली आहेत. मला खात्री आहे की सरकार त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत असणारच. मी भारतीय दूतावासांना विनंती करतो की त्या लोकांच्या स्थलांतरासाठी दुसरा एखादा पर्यायी मार्ग त्यांनी शोधावा. त्यांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.”

स्वर भास्कर :
अभिनेत्री स्वरा भास्करने देखील ट्वीट करत लिहिले, “जागतिक राजकारण सध्या फराज आरिफ अन्सारी यांच्या चित्रपटासारखं वाटत आहे.”

श्रुती सेठ :
टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्रीने ट्वीटमध्ये सांगितले, ‘युद्धात प्रत्येक जण हरतो.’

आदिल हुसेन :
इंग्लिश विंग्लिश फेम अभिनेते आदिल हुसेन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की,”सगळी कडचे युद्ध संपले पाहिजे.”

प्रियांका चोप्रा :
प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, यात मेट्रो स्टेशनमध्ये आसरा घेतलेल्या युक्रेनमधील लोकांचे विदारक दृश्य दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “युक्रेनमधील परिस्थिती भयानक आहे. निष्पाप लोक त्यांच्या जीवनासाठी आणि त्यांच्या प्रियजनांच्या जीवनासाठी भीतीने जगत आहेत, तर दुसरीकडे भविष्यातील अनिश्चितता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आधुनिक जगात अशा भयानक परिस्थितीबद्दल समजणे खूप कठीण आहे, परंतु ही अशी वेळ आहे ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल. या युद्धक्षेत्रात निष्पाप लोक राहत आहेत. तेही तुमच्या आणि माझ्यासारखे लोक आहेत.”

https://www.instagram.com/p/CaYsgjGNvJI/?utm_source=ig_embed&ig_rid=adf8fdb2-83ee-48b8-a9c0-a67d49173a0a

हेही वाचा –

हे देखील वाचा