Saturday, July 6, 2024

‘या’ कलाकारांच्या डोक्यावरून हरवलंय आईचं छत्र; एक तर जन्माला आल्यानंतर काही दिवसातच…

असे म्हणतात की देव सगळीकडे एकाच वेळी असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली. आईची थोरवी तिचे कर्तृत्व, तिचे आपल्यावरील प्रेम, आपल्या आयुष्यातील तिचे स्थान हे शब्दात सांगणे निव्वळ अवघडच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईची गरज असते. आईचे प्रेम, आईची शिस्त, आईचा ओरडा, आईच्या हातचे जेवण आदी असंख्य अशा गोष्टी आहेत ज्यांची इतर कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. आई, माँ, अम्मा, मदर, मम्मी, अम्मी आदी वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘आई’ या शब्दाचा उच्चार वेगळा असला तरी अर्थ आणि प्रेम एकच आहे. ‘आई’ या एका छोट्या शब्दात संपूर्ण विश्व सामावून घेण्याची ताकद आहे. आपल्याकडे एक म्हण आहे ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ तुमच्याकडे कितीही संपत्ती, कितीही पैसा असला पण तुमच्याकडे आई नसेल तर तुम्ही भिकारीच आहात.

आईचे प्रेम सर्वांनाच आयुष्यभर मिळते असे नाही, कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच या प्रेमाची अनुभूती मिळत असते. असे खूपच कमी लोकं असतील ज्यांना हे प्रेम, हा सहवास लाभला नसेल. नुकतेच अक्षय कुमारच्या आईचे निधन झाले. त्याने आईच्या निधनानंतर आपला आधारच गेल्याचे सांगितले आहे. आईच्या जाण्याचे दुःख कोणत्याच शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. जन्म घेतलेल्या व्यक्तीला एक दिवस जावेच लागते हा या सृष्टीचा नियम असला तरी मनुष्याचे मनं हे लोभी असते, कितीही मिळाले तरी त्याला ते कमीच वाटते. आई आहे ही भावनाच सर्वांना सुखावणारी असते. मात्र आज बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या आईला गमावले आहेत. आज अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

संजय दत्त:
बॉलिवूडचा बाबा अर्थात संजय दत्त नेहमीच विविध गोष्टींसाठी चर्चेत असतो. संजयची आई म्हणजे प्रसिद्ध दिग्ग्ज अभिनेत्री नर्गिस दत्त. संजय त्याच्या आईच्या खूपच जवळ होता. मात्र दुर्दैवाने नर्गिस यांनी खूपच लवकर संजयची साथ सोडली. संजू चित्रपटानुसार, जेव्हा संजयला त्याच्या आईच्या आजाराची माहिती मिळाली. तेव्हा त्याला मोठा धक्का बसला आणि आईला आजारी अवस्थेत न पाहू शकणाऱ्या संजयने ड्रग्स घ्यायला सुरुवात केली. त्याच्या आईच्या निधनानंतर तर संजय पूर्णपणे कोलमडला होता. मात्र त्याच्या वडिलांनी त्याची काळजी घेतली.

जान्हवी कपूर:
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी देखील तिच्या आईच्या खूप जवळ होती. ती तिच्या पहिल्या आणि पदार्पणाच्या ‘धडक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, अचानक तिला आईच्या निधनाची बातमी मिळाली. सेटवरच जान्हवी रडू लागली. ती तिच्या आईला शेवटच्या वेळी ही भेटू शकली नाही आणि तिला नेहमी याचा पश्चाताप होतो. जान्हवी नेहमी तिच्या आईच्या आठवणींना उजाळा देतांना असते.

प्रतीक बब्बर:
अभिनेता प्रतीक बब्बर हा राज आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील बॉलिवूडच्या यशस्वी नायिकांपैकी एक होत्या. १० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांचे मोठे प्रस्थ बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये निर्माण केले होते. मात्र, प्रतिकला जन्म दिल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे निधन झाले. प्रतीकला त्याच्या आईसोबत वेळच घालवता आला नाही. त्याला त्याच्या आईचा चेहरा देखील आठवत नसेल. पण ती त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. प्रतीक अनेकदा सोशल मीडियावर आई स्मिताचा फोटो टाकतो.

अर्जुन कपूर:
अभिनेता अर्जुन कपूर हा मोना कपूर आणि बोनी कपूर यांचा मुलगा आहे. तो नेहमी त्याच्या आईच्या खूप जवळ होता. मोना यांचे निधन झाल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसला. त्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्यातच त्याला अधिकाधिक जेवण्याचे व्यसन जडले आणि त्याचे वजन वाढत गेले. आईच्या मृत्यूनंतर अर्जुनला खूप एकटे वाटू लागले. परंतु, नंतर त्याने स्वतःची काळजी घेतली आणि त्याची बहीण अंशुलाची ही काळजी घेऊ लागला. आजही अर्जुन त्याच्या आईबद्दल बोलत असताना दुःखी होतो.

जेव्हा श्रीदेवी यांचे निधन झाले तेव्हा अर्जुनने जान्हवी आणि खुशीला खूपच उत्तम पद्धतीने सांभाळले. कदाचित आई गमवण्याचे दुःख काय असते हे त्याला माहित असल्यामुळेच तो हे करू शकला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

हे देखील वाचा