Tuesday, July 23, 2024

दुर्घटनेत ‘या’ कलाकारांचे झाले आकस्मिक निधन, एक अभिनेत्री तर होती गर्भवती

मार्वलच्या आगामी ‘मून लाइट’ सीरिजमध्ये महत्वाची भूमिका निभावणारा अभिनेता गास्पार्ड उलील याचा एका दुर्दैवी दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. त्याचा वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार गास्पार्ड हा स्कि साठी गेला असताना त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. गास्पार्ड उलीलच्या अशा आकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र ही पहिलीच अशी घटना नाही, ज्यात कलाकारांचे असे आकस्मिक दुर्दैवी निधन झाले. याआधी देखील अनेक कलाकारांनी अशा घटनांमध्ये आपला जीव गमावला आहे.

तरुणी सचदेव

तरुणी सचदेव ही केवळ 14 वर्षाची असताना तिचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. ती तिच्या काळातली सर्वात प्रसिद्ध बालकलाकार होती. तरुणी सचदेवला रसना गर्ल पण नावाने ओळखले जायचे. तिच्याबरोबर झालेली ही दुर्घटना खूप मोठा धक्का देणारी होती.

taruni sachdeva
Photo Courtesy : YouTube/Screengrab/Cine Samugam

अभिनेत्री सौंदर्या

सौंदर्या 17 एप्रिल 2004 ला विमानाने प्रवास करत होती आणि विमान दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण सिनेमासृष्टीला धक्का बसला होता. दुर्घटनेच्या वेळी ती दोन महिन्यांची गर्भवती देखील होती.

पॉल वॉकर

पॉल वॉकरचा 2013 मध्ये एका कार दुर्घटनेत मृत्यू झाला. फास्ट अँड फ्युरियस या सिनेमामध्ये पॉल वॉकरने मुख्य भूमिका निभावली होती. पॉल आपल्या मित्राबरोबर त्याची चॅरिटी ट्रस्ट “रिच आउट वर्ल्ड” या संस्थेच्या चॅरिटी इव्हेंटसाठी जात असताना ही दुर्घटना घडली. तो केवळ 40 वर्षांचा होता. त्याचा चाहता वर्ग म्हणतो की कार दुर्घटनेच्या वेळी त्याचा मित्र कार ड्राईव्ह करत होता जर स्वतः पॉल कार ड्राईव्ह करत असता तर ही दुर्घटना घडली नसती.

जसपाल भट्टी

जसपाल भट्टी हे एक उत्तम अभिनेते आणि कॉमेडियन म्हणून ओळखले जायचे. आपल्या सिनेमाच्या प्रमोशन करता मोगा ते जालंधर असा प्रवास करत असताना त्यांच्याबरोबर ही दुर्घटना घडली. जसपाल भट्टी यांना दूरदर्शन वर येणाऱ्या ‘उलटा पुलटा – फ्लॉप शो’ ह्या प्रसिद्ध टीव्ही शो मुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांच्याबरोबर झालेली ही दुर्घटना धक्का देणारी होती.

नंदामुरी हरिकृष्णा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन टी रामराव यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्णा यांचा 2018 मध्ये कार दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय 60 वर्ष होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एन टी आर याचे ते वडील होते. या दुर्घटनेमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा