आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य माणूस असो की सिनेसृष्टीतील कलाकार प्रत्येकजण ताणतणावाचे जीवन जगत आहे. याला कारण म्हणजे वाढलेली स्पर्धा. या धावपळीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी कमी वयातच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. याच हृदयविकाराच्या झटक्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले, ज्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. चला जाणून घेऊया हृदयविकाराच्या झटक्याने कोणत्या स्टार्सना आपला जीव गमवावा लागला आहे.
सतीश कौशिक
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी यांनी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
राजू श्रीवास्तव
कॉमेडीच्या दुनियेवर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना बराच काळ एम्स रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
श्रीदेवी
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. चित्रपटातील आयकॉनिक रोलमुळे त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. जाणाऱ्या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले. दुबईतील हॉटेलच्या खोलीत त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते.
ओम पुरी
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या ओम पुरी यांनाही हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले. 6 जानेवारी 2017 रोजी त्यांचे निधन झाले.
रीमा लागू
चित्रपटसृष्टीत ‘आई’च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेल्या रीमा लागू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 18 मे 2017 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
सिद्धार्थ शुक्ला
‘बिग बॉस 13’ या शोचा विजेता ठरलेला सिद्धार्थ शुक्ला. या शोमुळे शहनाज गिलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. 2 सप्टेंबर 2021 रोजी, 40 वर्षीय सिद्धार्थला हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले.
केके
प्रतिभावान गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके यांचे 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे एका म्युझिक शो दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते फक्त 53 वर्षांचे होते. (bollywood-celebrity-death-due-to-heart-attack)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी
भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल