Sunday, June 8, 2025
Home अन्य राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद किंवा आवड असते. असेच काही सेलिब्रिटी आहे ज्यांना वेगवेगळ्या गोष्टींची आवड आहे. मग त्यामध्ये काही ना बाईक आवडत असे तर काही जणांना कार. त्याचबरोबर काही जणांना फिरायला आवडत असेल. हे सेलिब्रिटी नेहमी आपली आवड जपत असतात. त्याचबरोबर काही सेलिब्रिटींकडे एकापेक्षा जास्त महागड्या कार आहेत. ज्यात आरामात बसून कुठेही जाऊ शकता, पण बाईकची एक वेगळीच मजा आहे.

photo courtesy Instagramthejohnabraham

 

ही गोष्ट फक्त तेच लोक समजू शकतात ज्यांना बाईक राइडिंगची आवड आहे. दुचाकीचा वेग जितका वेगवान असेल तितका तो तुम्हाला थ्रिलची जाणीव करून देईल. या रोमांचातील मजा फक्त दुचाकी शौकीनच समजू शकतात. बॉलिवूडपासून ते क्रिकेटपर्यंत, असे अनेक सेलिब्रिटीज आहेत ज्यांच्या घरात महागड्या कार धूळ खात पडल्या आहेत, परंतु बाईक त्यांना अधिक मोहित करतात. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ते जॉन अब्राहम आणि विवेक ओबेरॉय यांच्या नावांचा समावेश आहे.

महेंद्रसिंग धोनी:

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचे नाव दुचाकी शौकिनांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याला बाईक राइडिंगची इतकी आवड आहे की, त्याच्या गॅरेजमध्ये बाईकचा खूप मोठा संग्रह आहे. धोनीला खूप वेळा दुचाकी चालवताना ही पाहिले आहे. त्याच्या बाइक कलेक्शनमध्ये कावासाकी निन्जा एच २ सारख्या बाइक्सचा समावेश आहे. ज्याची किंमत ३५ लाखांपासून सुरू होते. ही बाईक १३२kp च्या वेगाने धावते.

जॉन अब्राहम :

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम देखील या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही. ‘धूम मचाले’ फेम अभिनेता खऱ्या जीवनात बाईक राइडिंगचा मोठा चाहता आहे. जॉनकडे यामाहा व्हीमॅक्स बाईक आहे. या बाईकची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे.

कुणाल खेमू :

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूला ही बाईक्सची खूप आवड आहे. त्याचे बाईकवरचे प्रेम हे त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते. अलीकडेच, त्याने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो लडाखच्या मैदानावर दुचाकी चालवताना दिसतो. कुणालकडे बीएमडब्ल्यू आर१२० जीएस साहसी बाईक आहे. जी त्याने स्वतःला भेट दिली होती, जेव्हा त्याचे ‘मलंग’ आणि ‘लूटकेस’ चित्रपट यशस्वी झाले. या बाईकमध्ये १२५४सीसी डबल सिलिंडर इंजिन आहे. या बाईकची किंमत १६ लाख ते २२ लाखांपर्यंत आहे.

आर माधवन :

बॉलिवूड अभिनेता आर माधवनला ही बाईकच्या दोन चाकांचा वेगवान वेग आवडतो. त्याच्याकडे डुकाटी डायवेल आणि यामाहा व्हीमॅक्स या बाईक आहे. या बाईक्स खूप चांगल्या बाईक्स आहेत.

विवेक ओबेरॉय :

अभिनेता विवेक ओबेरॉय हा देखील बाइक प्रेमींपैकी एक आहे. त्याच्याकडे पिवळ्या रंगाची डुसेटी बाईक आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर ही बाईक ७ लाख रुपयांपासून ६० लाख रुपयांपर्यंत येते.

यासोबतच इतरही अनेक कलाकारणकडे बाईक्सचे मोठे आणि आकर्षक कलेक्शन आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा