Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ आहेत बॉलिवूडमधील बहीण-भावांच्या प्रसिद्ध जोड्या; त्यांचे प्रेम पाहुन तुम्हीही जाल हरवून

बॉलिवूडमध्ये कलाकार नाती निभावत नाही किंवा त्यांना नात्यांची किंमत नाही असा आरोप अनेकदा केला जातो. अनेक प्रेक्षक कलाकार चित्रपटांमध्ये जशी भूमिका साकारतात तसेच ते खऱ्या आयुष्यात देखील असतात असे अनेकांना वाटते. मात्र असे अजिबात नाही. ते त्यांची सर्व नाती अतिशय सुंदर पद्धतीने निभावतात. नुकताच रक्षाबंधनाचा सण सर्वांनी साजरा केला. बॉलिवूडमध्ये देखील अनेक मोठे कलाकार आहेत ज्यांचे त्यांच्या बहिणीवर जीवापाड प्रेम आहे. या भावाबहिणींचे प्रेम अनेकदा जगासमोर देखील येतांना दिसते. आज आपण पाहूया अशाच काही कलाकारांच्या रियल लाईफमधील बहिणीं.

सलमान खान- श्वेता रोहीरा
सलमान खान तिच्या परिवाराबद्दल त्याच्या बहिणींबद्दल किती पझेसिव्ह हे सर्व जगाला माहित आहे. सलमानला अर्पिता आणि अलवीरा या दोघी बहिणी असून श्वेता रोहीरा ही त्याची मानलेली बहिण आहे. एकदा श्वेता सलमानच्या घरी पोहचली आणि त्याला म्हणाली, मला तुला राखी बांधायची आहे. त्यावर सलमान लगेच तिला हो बोलला आणि तिने त्याला राखी बांधली. तेव्हा पासून या दोघांचे बहिण भावाचे प्रेम आजवर तसेच आहे. सलमानने तिच्या लग्नात तिचे कन्यादान देखील केले होते.

ऋतिक रोशन- सुनैना रोशन
ऋतिक रोशन आणि त्याची बहिण सुनैना हे देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ बहीण आहे. सुनैनाला काही दिवसांपूर्वी कर्करोगाने ग्रासले होते. त्यावेळी ऋतिकने तिची खूप काळजी घेतली. या दोघांचे नाते आणि त्यांच्यातले जीवापाड प्रेम सर्वानाच माहित आहे. सुनैनाने काईट्स आणि क्रेजी 4 मध्ये को-प्रोड्युसर म्हणून काम केले आहे.

सैफ अली खान- सोहा अली खान
पतौडी खानदानातील सैफ अली खान आणि सोहा अली खान हे बहीण-भाऊ सुद्धा इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सोहाचा मोठा भाऊ असणारा सैफ नेहमी सोहासाठी उपलब्ध असतो. या दोन्ही बहिण भावांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

रणबीर कपूर- रिद्धिमा कपूर
ऋषी कपूर आणि नीतु सिंग यांची मुलं असलेल्या रिद्धिमा कपूर आणि रणबीर कपूर यांचादेखील खूप स्ट्रॉंग बॉंडिंग आहे. २००६ मध्ये रिद्धिमाने भारत साहनी यांच्याशी लग्न झाले. रणबीरने त्यांच्या लग्नात भावाची सर्व जबादारी उत्तम पद्धतीने निभावली.

https://www.instagram.com/p/CS1uD2RhLdA/?utm_source=ig_web_copy_link

अभिषेक बच्चन- श्वेता बच्चन
श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना तर सर्वच ओळखतात. श्वेता अभिनीत सक्रिय नसूनही तिला जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. बॉलिवूडमध्ये बिग बींची ही दोन्ही मुले आहेत. हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात.

श्वेता अभिषेकला त्याच्या जीवनातील प्रत्येक चढ उतारामध्ये मदत करते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा