Friday, July 5, 2024

‘या’ कलाकारांनी धुडकावली होती बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर, अनेक मोठ्या कलाकारांचा यादीत समावेश

लवकरच टेलिव्हिजन विश्वातला सर्वात विवादित शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस या रियॅलिटी शोचा १५ वा सिझन लवकरच सुरु होत आहे. यावर्षी तर बिग बॉस टीमने ‘बिग बॉस ओटीटी’ची देखील सुरुवात केली. बिग बॉस म्हटले की डोळ्यासमोर येतात ते एकमेकांशी सतत भांडणारे, आरडा ओरडा करणारे स्पर्धक. बिग बॉस हा शो खऱ्या अर्थाने सर्वच बाजूने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्यामुळेच या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. दरवर्षी प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट बघत असतात. या शोच्या प्रत्येक सिझन आधी सोशल मीडियावर आणि मनोरंजन जगात एक चर्चा मोठ्या जोशात सुरु असते आणि ती म्हणजे या पर्वात बिग बॉसच्या घरात कोणता कलाकार जाणार. यात अनेक नाव चर्चेत येतात. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकारांना बक्कळ रक्कमही दिली जाते. मात्र या सर्वांमध्ये असे देखील कलाकार आहेत, जे पैसा जास्त मिळूनही या घरात जायला नकार देतात. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे.

अंकिता लोखंडे :
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता खूप लोकप्रिय आहे. तिला तुफान फॅन फॉलोविंग आहे. मात्र तिने या घरात जायला नकार दिला. या नकाराचे कारण तिने स्पष्ट केले नाही.

आदित्य नारायण :

टेलिव्हिजन क्षेतार्तील सरावात लोकप्रिय सूत्रसंचालक आदित्य नारायणाला देखील या शोसाठी विचारणा झाली होती, मात्र त्याने त्याला स्पर्धक म्हणून जाण्यापेक्षा शोला होस्ट करायला जास्त आवडेल असे सांगितले.

माहिका शर्मा :
अभिनेत्री माहिका शर्माला देखील या पर्वात घरात जाण्याकरता विचारले गेले, मात्र तिने या ऑफरला नकार दिला.

अनुषा दांडेकर :
व्ही.जे. आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर करण कुंद्रासोबतच्या अफेयरमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली होती. तिला सुद्धा या शोसाठी विचारणा झाली होती, मात्र तिने देखील या घरात जायला नकार दिला होता.

दिव्यांका त्रिपाठी :
टीव्ही क्षेत्रातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून दिव्यांकाने ओळख मिळवली आहे. तिला देखील या शो साठी विचारले गेले, पण दिव्यांकाच्या पतीने विवेकने ती या घरत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

प्रिया बॅनर्जी :
वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांमुळे ओळखीचा चेहरा झालेल्या प्रिया बॅनर्जीला देखील हा शो ऑफर झाला होता. मात्र तिने देखील याला नकार दिला.

भूमिका चावला :
‘तेरे नाम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमिका चावलाला येथे अपेक्षित यश मिळाले नाही. साऊथमध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेल्या भूमिकाला देखील या घरात जाणायची संधी मिळाली होती मात्र तिने ती संधी नाकारली.

सुरभि चंदना :
‘इश्कबाज’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी सुरभी यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिला देखील बिग बॉस १५ साठी विचारले होते, पण तिने नकार दिला.

सनाया इराणी :
बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी आणि टेलिव्हिजनसोबतच अनेक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या सनायाला देखील बिग बॉसमध्ये जाण्यासाठी विचारले गेले, मात्र तिनेही नकार दिला.

पार्थ समथान :
कसोटी जिंदगी की फेम पार्थला सुद्धा यासाठी विचारणा झाली मात्र त्याने या घरात जायला नकार दिला.

बिग बॉस सुरु होईल तेव्हाच या पर्वाच्या स्पर्धकांवरून पडदा उठेल.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा