Wednesday, July 3, 2024

लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी ११’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘बिग बॉस १४’मधील ‘या’ स्पर्धकांच्या समावेशाची शक्यता

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक ‘खतरों के खिलाडी’ लवकरच पुनरागमन करण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या शोला यावर्षी देखील दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यावर सगळ्यात महत्त्वाची चर्चा उरते ती म्हणजे या शोमध्ये नक्की कोणते स्पर्धक असणार आहे. कलर्स टीव्हीवरील या शोला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असते. यात येणारे स्पर्धक त्यांच्या स्टंटने सर्वांची मने जिंकून घेतात. यातच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला न टांगता, त्यांनी या शोमध्ये येणाऱ्या संभाव्य स्पर्धकांच्या नावांची यादी देखील जाहीर केली आहे. द खबरीनुसार, ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये बिग बॉस 14 मधील काही स्पर्धक दिसू शकतात.

द खबरीने आपल्या ट्विटर अकाउंटवर या शोमधील संभाव्य स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी, एजाज खान या कलाकारांनी नावे समोर आली आहेत. हे सगळे कलाकार कलर टीव्हीवरील बिग बॉस 14 मध्ये दिसले होते. यातील रुबिना दिलैक‌ ही या पर्वाची विजेती ठरली आहे आणि निक्की तंबोली टॉप 3 विजेती होती.

या कलाकारांव्यतिरिक्त कमोलिका या नावाने प्रसिद्ध असलेली टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, पुरू चिब्बर, एरिका फर्नांडिस, मोहित मलिक, अर्जुन बिजलानी आणि बिग बॉस 13 मधील शेफाली जरीवाला ही देखील या शोमध्ये असणार आहे. या स्पर्धकांच्या यादीबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाही. पण द खबरी याच्या माहितीनुसार यातील काही नावांनी आधीच हा शो साईन केला आहे.

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी खतरों के खिलाडी 7 मध्ये देखील दिसला होता. परंतु आता त्याला गेस्ट म्हणून बोलावले आहे. परंतु नवीन माहितीनुसार अर्जुनला स्पर्धक म्हणून बोलवण्याची योजना सुुरू आहे. तसेच उर्वशी ही काही दिवसांपूर्वी ‘नच बलिये सिझन 9’ मद्ये स्पर्धक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा