आपल्या देशात अनेक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे होतात. प्रत्येक सणाचे एक वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र तरीही दिवाळी ही या सर्वांपेक्षा वेगळी आणि सर्वांच्या आवडीची आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा सुंदर संदेश देते. याच सणाचे महत्व लग्नानंतर पहिला दिवाळी सण साजरा करणाऱ्या जोडप्यांना जास्त असते. पहिला दिवाळ सण सर्वांसाठीच अविस्मरणीय असतो. बॉलिवूडमध्ये सुद्धा यावर्षी अनेक जोडपी आहेत जी त्यांच्या लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करत आहे. जाणून घेऊया याच जोडप्यांविषयी.
यामी गौतम आणि आदित्य धर :
बॉलिवूडमधील सुंदर जोडी म्हणून ओळख मिळवलेल्या या दोघांनी ४ जुलै २०२१ रोजी खासगी पद्धतीने लग्न केले. यावर्षी ही दिवाळी त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी असणार आहे. यासाठी यमीने खास प्लॅनिंग देखील केले आहे.
गौहर खान आणि जैद दरबार :
२५ डिसेंबर २०२० रोजी गौहर खान आणि जैद दरबार या दोघांनी लग्न केले. यावर्षी हे देखील त्यांची पहिली दिवाळी साजरी करणार आहे. मात्र यावर्षी शूटिंगच्या निमित्ताने गौहर मुंबईबाहेर असून ती आणि जैद वर्चुअल दिवाळी साजरी करणार आहे.
वरूण धवन आणि नताशा दलाल :
बॉलिवूडमधील हँडसम स्टुडंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूणने २४ जानेवारी २०२१ रोजी अलिबाग येथे त्याची मैत्री असणाऱ्या नताशासोबत लग्न केले. या दोघांचे लग्न चांगलेच गाजले होते. नुकतेच करवा चौथचे या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते ते पाहून नताशा प्रेग्नेंट असल्याच्या अफवा देखील उडाल्या होत्या.
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल :
बॉलिवूडमधील क्युट बॉय आणि उत्तम गायक असणाऱ्या आदित्य नारायणाने डिसेंबर २०२० मध्ये त्याच मैत्रीण श्वेतासोबत लग्न केले. त्यांची देखील लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने त्यांनी त्यासाठी काही खास प्लॅन्स केले आहेत.
दिशा परमार आणि राहुल वैद्य :
टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांनी १६ जुलैला लगीन गाठ बांधली. लग्नानंतर दिशा आणि राहुल तात्यांची पहिली दिवाळी दणक्यात साजरी करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?
-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी