Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमांनी केली बक्कळ कमाई

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमांनी केली बक्कळ कमाई

दिवाळी सण नुकताच सुरु झाला आहे. कोरोनामुळे मागच्यावर्षी दिवाळी नेहमी सारखी साजरी झाली नसली तरी यावर्षी मात्र दिवाळीचा उत्साह खूपच जास्त आहे. बॉलिवूडमध्ये प्रत्येक सणाचे औचित्य साधून चित्रपट प्रदर्शित केले जातात. कोरोनामुळे मागच्यावर्षी दिवाळी प्रेक्षकांसाठी आणि बॉलिवूडची अगदीच साधी होती. मात्र यावर्षी चित्रपटगृह खुली झाली असून, अनेक मोठे सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अनेक जणं उत्सुक असतात. यावर्षी ‘सूर्यवंशी’ हा मोठ सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडमध्ये याआधी देखील अनेक सिनेमे दिवाळीमध्ये प्रदर्शित झाले आणि सुपरहिट देखील ठरले. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही हिट सिनेमांची नावे.

ओम शांती ओम :
फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खान, दिपीका पदुकोण अभिनित ओम शांती ओम हा सिनेमा दिवाळीमध्येच प्रदर्शित झाला होता. ओम शांती ओम हा त्यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. या सिनेमाने २१५ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली होती. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटांची गाणी देखील तुफान गाजली.

प्रेम रतन धन पायो :
सलमान खान आणि सोनम कपूर यांचा हा सिनेमा २०१५ साली प्रदर्शित झाला होता. ईदला सलमानचा सिनेमा प्रदर्शित होत असतानाच दिवाळीमध्ये देखील सलमानने सिनेमा प्रदर्शित केला, आणि या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. ३१५ कोटी रुपयांची कमाई सिनेमाने केली होती.

गोलमाल अगेन :
रोहित शेट्टीची सुपरहिट फ्रँचायजी असणाऱ्या गोलमाल सिनेमाचा भाग असणारा गोलमाल अगेन हा हॉरर कॉमेडी सिनेमा दिवाळीतच प्रदर्शित झाला होता. अजय देवगण, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, कुणाल खेमू, श्रेयश तळपदे आदी कलाकारांच्या या सिनेमाने २०५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

सन ऑफ सरदार :
अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा यांचा हा सिनेमा २०१२ साली प्रदर्शित झाला होता. अश्विनी धर यांच्या या चित्रपटाने १६१ कोटी रुपये कमावले होते.

ए दिल हैं मुश्किल :
करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिक होत्या. दिवाळीचा या सिनेमाला खूप फायदा झाला आणि सिनेमाने ११२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा

-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी

-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

हे देखील वाचा