Saturday, June 29, 2024

कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी

बॉलिवूडमध्ये एक-दोन नव्हे, तर पिढ्यानपिढ्या चित्रपटसृष्टीवर अनेक कुटुंबे राज्य करत आली आहेत. त्यांच्या पणजोबांच्या पणजोबांनी दशकांपूर्वी उद्योगक्षेत्रात आपला प्रवास सुरू केला होता. काही कॅमेऱ्यासमोर तर, काही कॅमेऱ्याच्या मागे काम करत राहिले. बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासून बरेच बदल झाले आहेत. या नव्या युगासोबत ही पिढीही त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहे. जाणून घेऊया अशा काही सेलिब्रिटी कुटूंबाबद्दल, ज्यांच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे.

कपूर कुटुंब
बॉलिवूडच्या घराण्यांचा विचार केल्यास, हे नाव प्रथम येते. या घराण्याची चौथी पिढी कपूर बॉलिवूडवर राज्य करत आहे. तसेच त्यांची पुढची पिढीही तयार होत आहे. याची सुरुवात पृथ्वीराज कपूरपासून (Prithviraj Kapoor) झाली. ‘मुगले आझम’प्रमाणे हे घराणेही सम्राटांप्रमाणे सिनेविश्वावर राज्य करत आहे. राज कपूर (Raj Kapoor), शम्मी कपूर (Shammi Kapoor) आणि शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्यानंतर त्यांची मुले पडद्यावर दिसली. रणधीर कपूर (Randhir Kapoor), ऋषी कपूर (Rishi Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), गीता बाली (Geeta Bali), राजीव कपूर (Rajeev Kapoor), तर आता करिश्मा (Karishma Kapoor), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा वारसा पुढे चालवत आहेत. (these 7 families have been ruling bollywood for decades)

समर्थ कुटुंब
शोभना समर्थ (Shobhna Samarth) या त्यांच्या काळातील उत्तम अभिनेत्री होत्या. शोभना समर्थ यांच्यानंतर त्यांच्या मुली नूतन (Nutan) आणि तनुजा (Tanuja Mukerji) यांना त्यांचा वारसा मिळाला. तनुजाच्या दोन मुली काजोल (Kajol) आणि तनिषा (Tanisha Mukerji) यांनी चित्रपटाच्या पडद्यावर धुमाकूळ घातला. नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल (Mohnish Behal) अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसला. आता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन पडद्यावर आपले नशीब आजमावत आहे.

देओल कुटुंब
केवळ अभिनयातच नाही, तर आकाराच्या बाबतीतही हे बॉलिवूडचे मजबूत कुटुंब आहे. त्या काळातील माचो हिरो म्हणवल्या जाणाऱ्या धर्मेंद्रपासून (Dharmendra) हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर सनी (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) ही मुले आली. धर्मेंद्र यांची मुली ईशा देओलही (Esha Deol) पडद्यावर दिसली. आता या कुटुंबातील तिसऱ्या पिढीने, म्हणजेच सनी देओलचा मुलगा करण देओलने (Karan Deol) बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली आहे.

टागोर कुटुंब
साठच्या दशकातील सिझलिंग नायिका शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांचा वारसाही नवाबी शैलीत पुढे सरकत आहे. मात्र, टागोर घराण्याच्या ओळखीने नाव पुढे गेले नाही. पण शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि सोहा अली खानने (Soha Ali Khan) वडिलांप्रमाणे खेळात हात आजमावण्याऐवजी आईप्रमाणे चित्रपटाचा पडदा निवडला. आता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) देखील आपली छाप पाडत आहे.

खान कुटुंब
बॉलिवूडमध्ये खान कुटुंबांची कमतरता नाही. सलीम खान (Salim Khan) यांच्या घराण्याचा वारसा आता दुसऱ्या पिढीकडे गेला आहे. तर आमिर खानचे (Aamir Khan) कुटुंब तिसरी पिढी पुढे नेत असल्याचे दिसते. आमिर खानचे वडील ताहिर हुसेन आणि काका नासिर हुसेन, चुलत भाऊ मन्सूर खान यांच्याकडे चित्रपटांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी होती. आमिरचा भाचा इम्रान खान (Imran Khan) अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद चित्रपटाच्या पडद्यावर दिसला नाही, पण तो थिएटरमध्ये अभिनयाचे कौशल्य शिकत आहे. तसेच तो कॅमेऱ्याच्या मागे सक्रिय आहे. मुलगी इरा (Ira Khan) सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

रोशन कुटुंब
बॉलिवूडला पहिला देसी सुपरहिरो देणारे हे कुटुंबही तीन पिढ्यांपासून सक्रिय आहे. संगीत दिग्दर्शक रोशन लाल नागरथ यांच्यापासून हा प्रवास सुरू झाला. ते पडद्यावर संगीताचे सुंदर विश्व निर्माण करत राहिले. त्यानंतर राकेश रोशन (Rakesh Roshan) आणि राजेश रोशन (Rajesh Roshan) ही मुले आली. आता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) चित्रपटाच्या पडद्यावर कमाल दाखवत आहे.

आणखी एक कपूर कुटुंब
पृथ्वीराज कपूर यांच्या कुटुंबाशिवाय आणखी एक कपूर कुटुंब मायानगरीत स्थायिक आहे. हे कुटुंब सुरिंदर कपूरचे कुटुंब आहे. सुरिंदर कपूर यांनी फिल्मी दुनियेत निर्माता म्हणून काम केले. तर बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी दिग्दर्शक म्हणून तर अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी अभिनेता म्हणून सुरुवात केली. आता अर्जुन, जान्हवी, सोनम, हर्षवर्धन ही तिसरी पिढी म्हणून पडद्यावर दिसत आहेत. लवकरच शनाया कपूरही पडद्यावर तिची झलक दाखवणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

हे देखील वाचा