Sunday, December 8, 2024
Home साऊथ सिनेमा ‘या’ चित्रपटांमुळे एक रात्रीत मिळाली दाक्षिणात्य दिग्दर्शकांना पॅन इंडिया ओळख, जाणून घेऊया त्या दिग्दर्शकांबद्दल

‘या’ चित्रपटांमुळे एक रात्रीत मिळाली दाक्षिणात्य दिग्दर्शकांना पॅन इंडिया ओळख, जाणून घेऊया त्या दिग्दर्शकांबद्दल

मधल्या काही काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टी चांगलीच पुढे आलेली दिसून येत आहे. या चित्रपटांना संपूर्ण देशात पर्यायाने जगात मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम कौतुकास्पद आहे. कधी काळी केवळ वैशिष्ट्य परिसरापुरत्याच मर्यादित असणाऱ्या या चित्रपटांना काही दिग्दर्शकांनी जागतिक ओळख मिळवून दिली आहे. बॉलिवूडच्या मागच्या काही दशकांमध्ये अनेक साऊथ सुपरस्टार काम करायचे. रजनीकांत, नागार्जुन, चिरंजीवी, कमल हसन आदी अनेक कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये दिसले होते. आता काही सिनेमांमुळे साऊथच्या दिग्दर्शकांना मोठी ओळख मिळाली आहे. या दिग्दर्शकांनी त्याच्या प्रतिभेच्या जोरावर पॅन इंडिया ओळख मिळवली आहे. या लेखातून अशाच काही दिग्दर्शकांची माहिती घेऊया.

ए आर मुरुगदास :
ए आर मुरुगदास हे त्याच्या सुपरहिट सिनेमांसाठी ओळखले जातात. २००८ साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आमिर खान अभिनित ‘गजनी’ सिनेमाने त्यांना मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यावर्षी सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडत नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले. १०० कोटी कमावणारा हा पहिला सिनेमा होता.

संदीप रेड्डी वांगा :
संदीप रेड्डी वांगा यांनी २०१७ साली ‘अर्जुन रेड्डी’ नावाचा सुपरहिट सिनेमा बनवला. साऊथमध्ये हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर या सिनेमाचे हिंदी व्हर्जन ‘कबीर सिंग’ देखील त्यांनी बनवला. या चित्रपटाने त्यांना मोठी ओळख तर दिली शिवाय चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली. लवकरच संदीप रणबीर कपूरच्या ‘ऍनिमल’ मधून पुन्हा एकदा दिग्दर्शन करणार आहे.

एसएस राजामौली :
एसएस राजामौली हे नाव आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच माहित आहे. त्यांना सध्या चित्रपटांचे ‘पारस’ म्हणून संबोधले तरी चुकीचे ठरणार नाही. ते जो सिनेमा करतात तो हितच होत आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने त्यांना संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली. या सिनेमाला संपूर्ण देशातून अमाप प्रतिसाद मिळाला. सिनेमाच्या दुसऱ्या भागाने देखील बक्कळ कमाई केली होती. आता ते आरआरआर सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

प्रशांत नील :
कन्नड सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नील आधी फक्त कन्नड सिनेमासाठी ओळखले जायचे मात्र केजीएफ सिनेमा आला आणि त्यांना पॅन इंडिया ओळख देऊन गेला. सध्या प्रशांत नील यांच्या केजीएफ चॅप्टर २ ची सर्वच लोकं आतुरतेने वाट बघत आहे.

सुकुमार :
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ सिनेमा तुफान गाजला. अल्लू अर्जुनाची भूमिका, त्याचा अंदाज आजही लोकांना आठवत असेल. या सिनेमाने प्रदर्शनानंतर कमाईचे रेकॉर्डच केले. केवळ माऊथ पब्लिसिटीवर सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने १०० कोटींची कमाई केली. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सर्वानाच प्रतीक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा