Monday, July 1, 2024

अमिताभ बच्चनपासून ते कपिल शर्मापर्यंत ‘हे’ कलाकार आहेत डावखुरे; संपूर्ण जगावर सोडलीय आपली छाप

शुक्रवारी (१३ ऑगस्ट) सर्वत्र ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ साजरा करण्यात आला. ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ हा सर्वप्रथम १९७६ मध्ये लेफ्टहॅंडर्स इंटरनॅशनल इंकचे संस्थापक डीन आर. कॅम्पबेल यांनी साजरा केला होता. हा दिवस जगातील लोकसंख्येच्या तुलनेत डावखुरे लोक १० टक्के असल्याने त्यांच्यासाठी साजरा जातो. १३ ऑगस्ट रोजी इतर विविध देशांसह भारतातही ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ साजरा केला जात आहे.

अनेक अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, डावखुरे भाषा, भावना आणि नातेसंबंधांवर उजव्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे प्रक्रिया करू शकतात. हे त्यांना उजव्यांपेक्षा अधिक सर्जनशील होण्याकडे कल देत असतात. अशाप्रकारेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी डावखुरे आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार…

अमिताभ बच्चन
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने अनेक दशके गाजवली आहेत. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण जगावर आपली छाप सोडली आहे. बिग बी हे सध्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. बिग बी हे जगातील सर्वात प्रमुख डावखुऱ्यांपैकी एक आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे, अमिताभ बच्चन उजव्या हाताने लिहिण्यातही तितकेच कुशल आहेत, तर बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चनही डावखुरा आहे.

आदित्य रॉय कपूर
अभिनेता आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडमधील स्टार्सपैकी एक आहे. त्याने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. आदित्यने ‘आशिकी २’ आणि ‘मलंग’ सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने चाहते आणि समीक्षकांना प्रभावित केले होते. आदित्य रॉय कपूर डाव्यखुरा आहे, पण आदित्य डावखुरा आहे हे क्वचितच चाहत्यांना माहिती असेल. तो ‘सडक २’ मध्ये आलिया भट्ट आणि संजय दत्तसोबत दिसला होता. हा सिनेमा २८ ऑगस्ट, २०२० मध्ये रिलीझ झाला होता.

कपिल शर्मा
कपिल शर्मा प्रामुख्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा एक भाग आहे, तरी देखील हिंदी चित्रपटांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. कपिल शर्मा हा ‘द कपिल शर्मा शो’मुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या या शोमध्ये प्रेक्षकांना हसवण्यासाठी तो ओळखला जातो. कपिल शर्मा देखील डावखुरा आहे. तरीसुद्धा तो डावखुरा असल्याबाबत फारसा बोलत नाही.

सोनाक्षी सिन्हा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ते ‘दबंग’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सलमान खान होता. सोनाक्षी सुद्धा डावखुरी असल्याचे खूप कमी चाहत्यांना माहिती आहे. त्याचबरोबर सोनाक्षी सार्वजनिक व्यासपीठांवर याबद्दल जास्त बोलत नाही. परंतु पॅपराजींनी तिच्याकडून ऑटोग्राफ घेतला होता, तेव्हा तिने डाव्या हाताचा वापर करून ऑटोग्राफवर स्वाक्षरी केली होती. यादरम्यानचा फोटो पॅपराजींनी क्लिक केला होता. अलीकडेच तिने ट्वीट करत सांगितले की, “हे तुमच्या विवेकबुद्धीचे रक्षण करण्याची पहिली पायरी आहे.”

सोनाक्षी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

-‘बचपन का प्यार’ गाण्यावर थिरकल्या सोनाली कुलकर्णी अन् प्रार्थना बेहेरे, पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा