Wednesday, July 3, 2024

करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात टीव्ही जगतातील ‘ही’ लोकप्रिय जोडी करणार कॅमिओ

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात सोबत दिसणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमाची चांगलीच हवा मीडियामध्ये आणि बॉलिवूडमध्ये दिसून येत आहे. सतत हा सिनेमा मीडियाचे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा एकदा हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सिनेमात एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी पाह्यन्य कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची आहे. अनेक रियॅलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून तर काही शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून ते दिसतात. मात्र आता ते थेट करण जोहरच्या सिनेमात दिसणार म्हटल्यावर त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीने स्वतः तिच्या या भूमिकेबद्दल सांगितले आहे. भारती सिंगने सांगितले की, “एक दिवस मला करण जोहरच्या टीमकडून फोन आला आणि ते म्हणाले, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात एक जाहिरात आहे. आणि त्यांची इच्छा होती की तो सीन मी आणि हर्ष यांनी करावा.” सध्या त्यांनी त्यांचा सीन शूट केला असून, भारतीने सांगितले की, ते सेटवर होते तेव्हा अभिनेत्री श्रद्धा आर्या देखील तिथेच होती. आणि ती म्हणाली तिला करण जोहरसोबत काम करून खूप मजा आली.

दरम्यान रॉकी और रानी की प्रेम कहानी हा एक कॉमेडी सिनेमा असून, यात रणवीर सिंग रॉकी खाटूरिया ही भूमिका साकारणार असून, आलिया भट्ट राणी चॅटर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर करण जोहर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून, श्रद्धा आर्या आणि अर्जुन बिजलानी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारी असलेल्या सुलोचना दीदींच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा

 

हे देखील वाचा