बॉलिवूड दुनिया अशी आहे की, काही कलाकारांना रातोरात स्टार बनवते, तर काही कलाकारांना यश मिळताना दिसत नाही. मेहनत जरी खूप असली, तरीही कधी कधी ते मागे पडतात, असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडच्या लखलखत्या दुनियेत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूड चित्रपटातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, आणि आपले बॉलिवूडमधले नाव निश्चित केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनीदेखील या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परंतु अखंड मेहनत असूनदेखील, त्यांची मुलं बॉलिवूड क्षेत्रात पुढे येऊ शकली नाहीत. अशाच काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
फरदीन खान
फरदीन हा प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा आहे. फिरोजने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यात ‘कुर्बानी’, ‘यलगार’ आणि ‘गीता मेरा नाम’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. फरदीनलाही स्टारकिडचा फायदा झाला. त्याच्या वडिलांनी त्याला बॉलिवूडमध्ये लाँच केले, परंतु फरदीनला ते यश मिळालं नाही. फरदीन खानने 90 च्या दशकात ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर ‘लव के लिए कुछ भी करेगा,’ ‘ओम जय जगदीश’ यासह त्याने अनेक चित्रपट दिले.
View this post on Instagram
सरफराज खान
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि संवाद लेखक कादर खान यांचा मुलगा सरफराज खान, अशाच एका स्टार किड्सपैकी एक आहे. वडील एक प्रसिद्ध अभिनेते होते, आणि घरात अभिनयाचे वातावरण होते. लहान असताना, जेव्हा तो टीव्ही पाहत असे, तेव्हा तो त्याच्या इच्छेनुसार वागायचा. तेच वातावरण बघून सरफराजने अभिनेता होण्याचा विचारही केला. पण सुपरस्टारचा मुलगा असूनही, त्याला मोठ्या पडद्यावर नाव कमवता आले नाही. सरफराजने सलमान खानबरोबर ‘तेरे नाम’ आणि ‘वॉन्टेड’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्याचा नायक म्हणून यशस्वी होण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे.
सिकंदर खेर
अभिनेता अनुपम खेर अजूनही आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करत आहेत. त्यांचा स्टारडम कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. शेवटच्यावेळी ते ‘वन डे: जस्टिस डिलिव्हर्ड’ या चित्रपटात दिसले होते. त्यांचा मुलगा सिकंदर खेर याची फिल्मी कारकीर्द काही खास नव्हती. असे आहे की, प्रेक्षक त्याच्या चित्रपटांचे नाव विचार केल्याशिवाय सांगू शकत नाहीत. त्याचा पहिला चित्रपट २००८ मध्ये ‘वुडस्टॉक विला’ हा होता.
View this post on Instagram
महाक्षय चक्रवर्ती
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि डान्सर मिथुन चक्रवर्ती अजूनही चित्रपटांमधील त्यांच्या शैलीसाठी ओळखले जातात. ८० च्या दशकात मिथुन यांना खरी ओळख मिळाली, परंतु मिथुन यांचा मुलगा महाक्षय याची चित्रपट कारकीर्द अद्याप गाजलेली नाही. प्रेक्षकांना ‘हान्टेड’ चित्रपटातून महाक्षय माहित आहे, त्यानंतर असा कोणताही चित्रपट लक्षात राहण्यासारखा नाही. त्याचबरोबर मिथुनचा स्टारडम आजही कायम आहे.
View this post on Instagram
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्काला आठवले बालपणीचे जुने दिवस; व्हिडिओ शेअर करत म्हणाली,’इथेच मी पोहायला…’
सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’