दाक्षिणात्य सुपरस्टार आपल्या दमदार अभिनयाने आणि गुड लुक्समुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. या सर्वच कलाकारांचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. या चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये पाहण्याची खुप इच्छा असते. अशा अनेक संधीसुद्धा या दाक्षिणात्य अभिनेत्यांकडे चालून येत असतात, परंतु तुम्हाला ऐकून धक्का बसेल की अनेक मोठमोठ्या दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत.
दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांइतकेच आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी चाहत्यांवर चांगलीच मोहिनी घातली आहे. अशा अनेक दिग्गज दाक्षिणात्य कलाकारांना एकदा तरी बॉलिवूडमध्ये झळकताना पाहण्याची इच्छा सर्वांची असते. यापैकी अनेक दिग्गज कलाकारांना हिंदी चित्रपटात काम करण्याच्या संधीसुद्धा येतात, परंतु वेगवगेळ्या कारणांमुळे हे कलाकार स्पष्ट नकार देतात. कोण आहेत हे दाक्षिणात्य सुपरस्टार चला जाणून घेऊ.
अनुष्का शेट्टी – चित्रपट ‘सिंघम’
प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण तिने या ऑफर्सला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अजय देवगणचा सुपरहीट चित्रपट ‘सिंघम’साठी अनुष्काचे नाव सुचवले गेले होते, परंतु त्यासाठी तिने नकार दिला होता.
नयनतारा – चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’
अभिनेता शाहरुख खानचा प्रसिद्ध चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ दाक्षिणात्य सिनेअभिनेत्री नयनताराला ऑफर करण्यात आला होता. मात्र यासाठी तिने नकार दिल्याने नंतर दीपिका पदुकोणला या चित्रपटात घेण्यात आले.
रश्मिका मंदाना – चित्रपट ‘जर्सी’
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण याआधी एका प्रसिद्ध चित्रपटात काम करण्यास तिने नकार दिला होता. रश्मिकाला शाहीर कपूरसोबत ‘जर्सी’ चित्रपटासाठी विचारण्यात आले होते, परंतु तिने यासाठी नकार दिला होता.
अल्लू अर्जुन -चित्रपट ‘बजरंगी भाईजान’
दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असलेल्या अल्लू अर्जुनला ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटासाठी निर्मात्यांनी पहिली पसंती दर्शवली होती. परंतु या अभिनेत्याने ही ऑफर धुडकावून लागली होती. त्यानंतर या चित्रपटात सलमान खानने काम केले होते. दरम्यान ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट जबरदस्त लोकप्रिय ठरला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत










