Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत चीटिंग करत दिला होता धोका

बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत चीटिंग करत दिला होता धोका

आज (१४ फेब्रुवारी) संपूर्ण जगात व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) साजरा होत आहे. प्रेमाचा रंग आजच्या दिवशी उधळला जात असताना बॉलिवूडमध्ये देखील व्हॅलेंटाइन डे जोशात साजरा होत आहे. आजच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात एक परफेक्ट जोडीदार पाहिजे असतो. मग स्त्री असो वा पुरुष. मात्र कधी कधी मनुष्य चुकतो आणि तो आपल्या जोडीदाराप्रती खरा राहत नाही आणि भावनेच्या भरात चीटिंग करून बसतो. अशा चिटिंगची अनेक उदाहरणं बॉलिवूडमचे गाजली आहेत. आजच्या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया अशाच काही चीटर कलाकारांबद्दल.

अक्षय कुमार :
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय ओळखला जातो. यासोबतच सुपरहिट चित्रपटांचे मशीन देखील त्याला म्हटले जाते. आज जरी अक्षय एक परफेक्ट पती आणि वडील असला तरी एकेकाळी त्याचा देखील पाय घसरला होता. ‘मोहरा’ सिनेमाच्या शुटिंगवेळी अक्षय आणि रवीना एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. जवळपास तीन वर्ष ते नात्यात होते. एका माहितीनुसार त्यांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र असे असूनही अक्षयने दुसऱ्या अभिनेत्रीला डेट करायला सुरुवात केली होती.

Photo Courtesy: Instagram/akshaykumar

रणबीर कपूर :
रणबीर कपूरची इमेज देखील कॅसिनोवा इमेज म्हणून ओळखली जाते. दीपिका आणि रणबीर यांचे नाते मीडियामध्ये तुफान गाजले. दोघे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र तेव्हाच दीपिका समजले की रणबीर तिला चिट करत कॅटरिना कैफला डेट करत आहे. त्यावेळी दीपिकाने ब्रेकअप केले.

Ranbir-Kapoor
Photo Courtesy: Instagram/neetu54

गोविंदा :
हिरो नं १ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाने देखील त्याच्या पत्नीला चिट केले आहे. असे सांगितले जाते की, गोविंदाचे राणी मुखर्जीसोबत एक्सट्रा मैरिटल अफेयर होते. जेव्हा सुनीताला याबद्दल समजले तेव्हा तिने हे प्रकरण हाताळणे आणि गोविंदा राणीचे ब्रेकअप झाले.

Govinda
Photo Courtesy: Instagram/govinda_herono1

राज बब्बर :
जेष्ठ अभिनेते राज बब्बर यांनी देखील त्यांची पत्नी असलेल्या अभिनेत्री नादिरा यांना चिट केले आहे. नादिरा यांच्यासोबत लग्न होऊनही राज स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. स्मिता यांच्यासाठी राज यांनी पत्नी आणि मुलांना देखील सोडले. मात्र स्मिता यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नादिरा यांच्याकडे जाणे पसंत केले.

 

अक्षय कुमार :
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या अफेयरने ९० च्या दशकात तुफान लाईमलाइट मिळवले. ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र पुढे त्याने शिल्पसोबत ब्रेकअप केले. मात्र एक काळ असा होता जेव्हा क्षय शिल्पा आणि ट्विंकल दोघीनाही डेट करत होता.

Photo Courtesy: Instagram/akshaykumarr_

दिलीप कुमार :
ट्रॅजिडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांनी देखील चीटिंग केली आहे त्यांचे आत्मचरित्रात त्यांनी हे कबूल देखील केले, की त्यांनी सायरा बानो यांना चिट केले. १९८१ साली दिलीप यांनी सायरा यांना सोडून आसमा रहमान यांच्याशी लग्न केले. मात्र दोन वर्षांनी ते पुन्हा सायरा यांच्याकडे परत आले.

dilipkumarfc
Photo Courtesy: Instagram/dilipkumarfc

राज कपूर :
राज कपूर यांनी देखील पत्नी कृष्णा राज कपूर यांच्यासोबत चीटिंग केली. राज हे लग्नाच्या आधीपासूनच नर्गिस यांच्या प्रेमात होते. मात्र घरच्यांनी त्यांचे लग्न कृष्णा यांचयासोबत लावून दिले. मात्र लग्नानंतरही ते नर्गिस यांना विसरले नव्हते.

raj kapoor
raj kapoor

हेही वाचा –

 

हे देखील वाचा