मनोरंजनविश्वातून अनेकदा आपल्याला कलाकारांच्या नात्यांबद्दल वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. ‘कितने अजीब रिश्ते यहा पे’ असे या क्षेत्राबद्दल नेहमीच म्हटले जाते. कधी कोणते नाते तुटेल आणि कधी कोणते नाते जुळेल याची कोणालाही पुसटशी कल्पना नसते. अनेक वर्षांची जुनी नाती इथे खूपच तुटतात आणि नवीन नाती तेवढ्याच सहज पद्धतीने जुळतात देखील. हे फक्त बॉलिवूडमध्येच होते असे नाही टेलिव्हिजन क्षेत्रातही अनेकदा कलाकारांना त्यांच्या नात्यांना घेऊन बरेच चढ उतार पाहावे लागतात. या क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी ब्रेकअपचे दुःख पचवले आणि दुसऱ्यांदा त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम सुख घेऊन आले. आज आपण या लेखातून अशाच काही अभिनेत्री बघणार आहोत ज्यांनी ब्रेकअपचे मोठे दुःख पचवले आहे.
रूबीना दिलैक :
बिग बॉस शोची विजेती ठरलेल्या रूबीनाने देखील हे दुःख पचवले आहे. रूबीना आधी तिचा सहकलाकार असलेल्या अविनाश सचदेवसोबत नात्यात होती. मात्र कोणत्या कारणामुळे तिचे ब्रेकअप झाले. एका मुलाखतीमध्ये बोलतां तिने सांगितले होते की, या ब्रेकअपनंतर ती नैराश्यात गेली आणि दिड महिना तिने स्वतःला एकट्यात कोंडून घेतले होते. कुटुंबातील सदस्यांना देखील ती भेटत नव्हती.

चारू असोपा :
टीव्ही अभिनेत्री असलेली चारू आज सुश्मिता सेनची वाहिनी झाली आहे. तिने सुश्मिताच्या भावासोबत राजीवसोबत लग्न केले असून आता ती एका मुलीची आई देखील बनली आहे. मात्र या लग्नाआधी चारू तिचा सहकलाकार असलेल्या नीरज मालवीयसोबत नात्यात होती. तिने त्याच्यासोबत साखरपुडा देखील केला होता. मात्र नंतर त्यांचे नाते तुटले. यानंतर चारू मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खात होती. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी ती सतत प्रवास देखील करत होती.

दिव्यांका त्रिपाठी :
दिव्यांका आज जरी एक सुखी वैवाहिक आयुष्य जगत असली तरी तिने देखील ब्रेकअपचे दुःख सहन केले आहे. दिव्यांका आधी शरद मल्होत्रासोबत नात्यात होती. मात्र त्यांचे देखील ब्रेकअप झाले. पुढे तिला परत मिळवण्यासाठी शरदने तंत्र मंत्र वापरून तिला परत आणण्याचे देखील प्रयत्न केले.

अदा खान :
अदा खान ही टीव्ही अभिनेता असलेल्या अंकित गेरासोबत नात्यात होती. मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर ती डिप्रेस राहायची. मात्र यातून तिनेच स्वतःला सांभाळले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

सना खान :
अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धक राहिलेल्या सना खानने देखील हे दुःख पचवले आहे. सना नृत्यदिग्दर्शक असणाऱ्या मेल्विन लुईससोबत नात्यात होती. मात्र तिला प्रेमात धोका मिळाला आणि तिने ब्रेकअप केले. तिचे हे ब्रेकअप इंडस्ट्रीमध्ये खूपच गाजले होते. आता सनाने ग्लॅमर इंडस्ट्री ओढली असून ती तिच्या नवऱ्यासोबत सुखी आहे.

काम्या पंजाबी :
काम्या पंजाच्या टीव्ही अभिनेता असलेल्या करण पटेलसोबत नात्यात होती. मात्र त्यांच्या ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. पुढे तिने स्वतःला सांभाळले आणि काम करण्यास सुरुवात केली. आता काम्याने एका डॉक्टरसोबत लग्न केले असून, ती सुखी आयुष्य जगत आहे.

हेही वाचा :