सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराईचा सिझन आल्याचे चित्र आहे. विकी कौशल, कॅटरिना कैफ, राजकुमार राव, पत्रलेखा, रणबीर कपूर, आलिया भट्ट आदी अनेक कलाकार लवकरच लग्न करणार असल्याच्या अनेक बातम्या मीडियामध्ये फिरत आहे. कोरोनाचा कहरही कमी झाल्याने हे कलाकार अधिक मोकळेपणाने त्यांचे लग्न करू शकतात. बॉलिवूडमध्ये तर अनेक जोड्या लग्न करणार आहेत. मात्र टीव्ही इंडस्ट्री देखील यात मागे नाही. टेलिव्हिजन विश्वातील अनेक अभिनेत्री येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. बॉलिवूडसोबतच टेलिव्हिजन जगतातील अनेक जोड्या विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. मात्र टीव्ही क्षेतार्तील अशा कोणत्या जोड्या आहेत ज्या लग्न करणार आहेत चला तर जाणून घेऊया.
अंकिता लोखंडे :
टेलिव्हिजन इंडस्त्रामधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणून अंकिता ओळखली जाते. मागील अनेक दिवसांपासून अंकिता आणि तिचा बॉयफ्रेंड असणाऱ्या विकी जाईच्या लग्नाबद्दल बातम्या येत आहेत. अंकिता आणि विकी डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. शिवाय अंकिता तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून देखील तिच्या लग्नाच्या हिंट देताना दिसत आहे.
पूनम प्रीत :
अभिनेत्री पूनम प्रीत देखील लवकरच लग्नबंधनात अडकू शकते. मिळणाऱ्या बातम्यांनुसार पूनम येत्या २६ नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. तिने काही काळापूर्वीच संजय गगनानीसोबत साखरपुडा केला होता. आता हे दोघे लग्न करणार आहेत.
श्रद्धा आर्या :
कुंडली भाग्य फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या सतत तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. श्रद्धा देखील नेव्हीमधील एका खास व्यक्तीसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. ती व्यक्ती नक्की कोण आहे, याबद्दल जास्त माहिती नसली तरी श्रद्धा लग्न करणार हे पक्के मानले जात आहे.
मौनी रॉय :
टेलिव्हिजनसोबतच बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय असणारी आणि लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणून मौनीकडे पाहिले जाते. मौनीने तिच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. टिचून ‘नागीण’ ही भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली. मौनी देखील येत्या काही महिन्यात दुबईमधील तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुरज नाम्बियारसोबत लग्न करू शकते.
देवोलिना भट्टाचार्य :
साथ निभाना साथिया मालिकेत गोपी बहू बनून प्रकाशझोतात आलेली देवोलिना एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. देवोलिना देखील मागील काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. बिग बॉसच्या घरात देवोलिनाने तिच्या नात्याबद्दल खुलासा करत ती २०२२ च्या सुरुवातीला लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका