अनेकदा बॉलिवूडचे सिनेमे त्यांच्या बजेटमुळे मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे येत असतात. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आले ज्यांचे बजेट १०० कोटींपेक्षा जास्त होते. आजकाल चित्रपटांचे बजेट खूप वाढले आहे. चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील बऱ्याच गोष्टींशी अनेकदा तुलना होताना दिसते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिले जायचे मात्र काळ बदलला तसे टीव्ही क्षेत्राचे रुपडे बदलले आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधेल अनेक मालिका देखील मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात दाखवल्या जात आहे. आज आपण या लेखातून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अशा मालिका जाणून घेणार आहोत ज्या बनवण्यासाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये लावले गेले.
नागीन ६ :
एकता कपूरचा हा आगामी श सध्या खूपच बज निर्माण करत आहे. तेजस्वी प्रकाशची मुख्य भूमिका असणारा हा शो लवकरच ऑन एयर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘नागीन’चा हा सिझन एकता कपूरने सर्वात महाग बजेटमध्ये बनवला आहे. या शोसाठी एकताने तब्बल १३० कोटी रुपये खर्च केले असून, एकता या शोला भव्य स्वरूपात शूट करत असल्याने यावर एवढा खर्च केला जात आहे.
महाभारत :
स्टार प्लसवरील यशस्वी आणि धमाकेदार असणारा ‘महाभारत’ ही मालिका २०१३ साली सुरु झाली होती. सर्वात मोठे महाकाव्य असणाऱ्या ‘महाभारत’ या ग्रंथावर हा शो आधारित होता. या शो साठी १०० कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. अतिशय महाग आणि आकर्षक व्हीएफएक्स आणि भव्य सेट यांमुळे हा शो खूपच खर्चिक ठरला.
बिग बॉस :
बिग बॉसच्या प्रत्येक पर्वातील घराला अतिशय भव्य आणि मोठे दाखवले जाते. सलमान हा या शोचा सूत्रसंचालक असून, तो या शोसाठी मोठी रक्कम घेतो. याशिवाय शोच्या विजेत्याला देखील ५० लाखांचे बक्षिसे दिले जाते. यासर्व गोष्टी पहिल्या तर या शोच्या एका भागासाठी १/२ कोटी रुपये खर्च केला जातो.
जोधा अकबर :
२०१३ साली आलेल्या झी टीव्हीवरील ‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक मालिकेचा देखील या यादीत समावेश आहे. या शोमध्ये कलाकारांचे ड्रेस, अंदाज, सेट यासर्व गोष्टींमुळे हा टेलिव्हिजनवरील सर्वात महाग शो ठरला.
शनी :
कलर्स टीव्हीवरील ‘कर्मफलदाता शनि’ टीव्ही विश्वातील एक महाग शो म्हणून ओळखला जातो. या मालिकेच्या सेटसाठी ६५ हजार स्क्वेयर फिट जागा वापरली गेली. शिवाय कलाकारांच्या पोशाखांवर लाखो खर्च केला गेला.
24 :
अनिल कपूर यांची पहिली टेलिव्हिज मालिका असणारी ’24’ देखील या यादीत आहे. या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी २ कोटी रुपये खर्च केला गेला.
हेही वाचा-